सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या गाडीला लोधवडे, ता. माण, जि. सातारा गावानजीक सकाळी आठ वाजता भीषण अपघात झाला यामध्ये एक जण ठार तर सात जण जखमी झाले आहे जखमी झालेले सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी चे रहिवासी आहेत अपघातात कल्याण भोसले हे मयत झाले असून घटनास्थळी दहिवडी पोलीस ठाण्याचे साहाय्य्क पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आषाढी एकादशी निमित्त कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील पैलवान प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे बोलेरो गाडी क्रमांक एम एच 11 बी एच 08 96 पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले होते त्यांच्यासोबत इतर आठजण गाडीतून प्रवास करत होते गोंदवले खुर्द नजिक यांची गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावरून गाडी उंच उडाली आणि थेट चार वेळा गाडी पलटी होत एका रानात जाऊन पडली यातील सर्व भाविक यामुळे जखमी झाले गाडीत कल्याण भोसले वय 45, चालक अण्णा गाढवे वय 42, दादासो थोरात वय 42, सागर भोसले, विजय माने, श्रीमंत पवार, रुद्र भोसले सर्वजण राहणार गुजरवाडी तालुका कोरेगाव येथील असून आठ जण प्रवास करत होते अपघाताची माहिती समजतात लोधवडे संभाजीनगर येथील रहिवाशांनी घटनास्थळी येऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले रुद्र भोसले वय १३ हा देखील गाडीत होता तो लहान असूनही सगळ्यांना धीर देत जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथून पुढील उपचारासाठी सातारा येथील मौर्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली सदर ठिकाणी गेल्या काही महिन्यापूर्वी पळशी येथील तीन तरुणाचाही भीषण अपघात झाला होता त्यात ते तीन जण जागीच मयत झाले होते सदर आपघाट हा रस्त्याच्या सदोष रचनेमुळे झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी रस्ता अचानक उंच सकल करण्यात आला असल्याने या ठिकाणी वाहने हवेत जंप करतात या ठिकाणी यापूर्वी देखील अपघात झाले असून रस्त्यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.