Home अमरावती सिपना इंजि.कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय खेरडे आदर्श व्यक्तिमत्त्व- प्रा.अरुण बुंदेले ” उपेक्षित...

सिपना इंजि.कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय खेरडे आदर्श व्यक्तिमत्त्व- प्रा.अरुण बुंदेले ” उपेक्षित समाज महासंघाचे आयोजन “

76

 

अमरावती ( वार्ताहर )
” स्वकार्यावर निष्ठा ठेवून 33 वर्षापासून प्रामाणिकपणे कार्य करून प्रोफेसर व विद्यार्थ्यांसमोर एक आदर्शाचा पाठ निर्माण करणारे डॉ. संजय खेरडे एक आदर्श प्राचार्य असून आदर्श व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. त्यांनी अमरावती येथील सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातच नव्हे तर शेगाव इंजिनिअरिंग कॉलेज, पी.आर.पोटे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज व डॉ .सौ.कमलाताई गवई इंजिनियरिंग कॉलेज मधीलही हजारो विद्यार्थी घडविले. त्यांचे हजारो विद्यार्थी आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सेवाकार्य करीत आहेत.” असे विचार प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते अमरावती येथील सिपना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२६ जून ला संपन्न झालेल्या सत्कार समारंभाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
सत्कार समारंभाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष, उपेक्षित समाज महासंघ), सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. संजय खेरडे, सौ.अनिता खेरडे, प्रमुख अतिथी अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान), ओमप्रकाश अंबाडकर, प्रा.एन.आर.होले, वसंतराव भडके, मधुकर आखरे, कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे, किसान नेते शंकरराव आचरकाटे, मरार माळी समाज नेते रामकुमार खैर होते.
उपेक्षित समाज महासंघ व कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. संजय खेरडे वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी असलेल्या हॉलमध्ये त्यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि प्रा. श्रीकृष्ण बनसोड आणि प्रा.अरुण बुंदेले लिखित पुस्तके भेट देऊन सपत्निक भावपूर्ण सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड आपल्या भाषणात म्हणाले की, “प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांचे शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आज ते त्यांच्या ध्येय आणि चिकाटीमुळे महाविद्यालय यशोशिखरावर पोहोचवित आहे.” असे विचार व्यक्त केले.
सत्कार सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.संजय खेरडे मनोगतात म्हणाले की, “आज मी जवळपास गेली 33 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. चार ते पाच शैक्षणिक संस्थांमध्ये खूप चांगले व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व सहकाऱ्यांची साथ लाभली त्यामुळे अनेक गोष्टी सहज शक्य करता आल्या. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे NAAC ऍक्रेडिटेशन NBA ऍक्रेडिटेशन, ISO सर्टिफिकेशन, वर्ल्ड बँक फायनान्स प्रोजेक्ट तसेच
ऑटोनामी व इतर शैक्षणिक विविध उपक्रम हे संस्थांमध्ये यशस्वीपणे राबविता आले. हे सर्व करताना सिपना शैक्षणिक प्रसारक मंडळाच्या संस्थेचे अध्यक्ष जगदीशभाऊ गुप्ता यांचे मिळत असलेले मार्गदर्शन व माझ्या सर्व सहकाऱ्यांची मिळत असलेली साथ यामुळे उत्तरोत्तर एकेक कार्य यशस्वी होत आहे. यासोबातच माझे वडील स्व.श्री मधुकरराव, मातोश्री श्रीमती ताराबाई यांचे शुभ आशीर्वाद व मार्गदर्शन तथा लहान बंधू श्री विनय व त्याचे कुटुंबीय आणि लहान बहिण सौ. प्रीती व तिचे कुटुंबीय व ह्या प्रवासात यशस्वीपणे साथ देणारी व प्रत्येक पावलावर मला मदत करणारी माझी अर्धांगिनी सौ.अनिता तसेच सुकन्या कु. ईशिता ह्यांचा सिंहाचा वाटा आहे व तसेच समाजबांधव यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळाले. सर्वांचे मी आभार मानतो.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एन. आर. होले, संचालन श्री ओमप्रकाश अंबाडकर तर आभार श्री मधुकर आखरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here