✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.29 जून)
जून महिन्याच्या पहिल्याच पावसामध्ये उमरखेड शहरातील विविध वार्डामध्ये नाल्याचे काम अपूर्ण असल्यामुळे पानीच पाणी साचले आहे.
तसेच जिजाऊ नगर व राजे संभाजीनगर या वार्डामध्ये नाल्याबरोबर रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे झाले असून त्यामध्ये पाणी साचलेले असल्यामुळे या नगरातील नागरिकांना जाण्या येण्यास खूप अडथळा निर्माण झाला आहे. याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब नाल्या बांधून रस्त्याचे काम पूर्ण करावी अशी मागणी जिजाऊ नगर व संभाजीनगर येथील नागरिकांनी केली आहे.
या भागातील नागरिकांनी वेळोवेळी नगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तसेच नगरपालिकेच्या अंतर्गत हे वार्ड येत असल्यामुळे हे पूर्ण कामे करणे नगरपालिकेचे कर्तव्य आहे हे काम झाले नसल्यामुळे या वार्डातील नागरिकांनी त्वरित काम पूर्ण करायची मागणी नगर प्रशासनाला केलेली असल्यामुळे मुख्याधिकारी यांनी याची दखल घेऊन ताबडतोब नाल्याचे बांधकाम व रस्त्याचे काम करावे अशी मागणी केली आहे.