✒️प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड (दि. 28 जून) शहरातील वतनदार लोक म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डातील मागासवर्गीय बौद्ध दलीत बांधव यांच्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या समस्यां सोडवण्यासाठी न.प प्रशासना चे अधिकारी जाणून बुजून या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.
मागील पाच दिवसापासून नाल्यांचे साफसफाई नाही सर्व वार्डातील नाल्या तुडुंब घाणीने भरलेले आहेत.
आणि वार्ड साठी नाली साफसफाई कर्मचारी कोण? आहे. हे वार्डातील नागरिकांना माहीतच नाही. कारण 2 वर्ष पासून तो वार्ड मध्ये नाली साफसफाई करण्यासाठी आलाच नाही. फक्त हदगाव येथील ठेकेदाराची 2 मजूर येतात पण ते 4,5 दिवसाला या बद्दल संबंधित अधिकारी कर्मचारी यांना वारंवार सांगण्यात आले आहे.
तसेच वार्डातील स्ट्रीट लाईट पाच दिवसापासून बंद अवस्थेत आहे वारंवार सांगून सुद्धा यावर कुठलीही बंदोबस्त केलेले नाही. तीन दिवसापासून अर्ध्या वार्डाला पाणीपुरवठा बंद आहे. पर्याय पाणी उपलब्ध करण्याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
मागील पाच वर्षा पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे बांधकाम हे जीर्ण झाल्याने ते पाडून नवीन वाचनालय बांधण्यात यावे.
बौद्ध स्मशानभूमी मधील बैठक व्यवस्थेमधील बसण्यासाठी फरशा बसवण्यात याव्या तसेच दहनसेड मध्ये सरनजाळी शेड अद्यापही उपलब्ध करून दिले नाहीत. तसेच बौद्ध स्ममशान भूमी मधील बोरवेल एक वर्षापासून बंद अवस्थेत आहे.
वारंवार सांगून सुद्धा त्याचे काम पूर्ण केलेले नाही.
बौद्ध स्मशान भूमी मधील सिमेंट रोड हा निष्कृष्ट दर्जाचा बनवला आहे तो पुन्हा उत्कृष्ट दर्जाचा बनवण्यात यावा ही मागणी वारंवार निवेनाद्वारे केली आहे.
पण नगरपरिषद प्रशासन हे मागासवर्गीय लोक दलीत वस्ती मध्ये राहतात म्हणून जाणून बुजून दुर्लक्ष करतात का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
आगामी काळात वरील सदर मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास समस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डातील नागरिकांच्या व भीम टायगर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना उमरखेड) यांनी दिली आहे.