Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

112

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि. 26 जून ):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन तथा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, चांदाच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांचे विशेष उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देवेश कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर संबोधनात राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकून त्यांचे त्यांचे विचार आजही प्रासंगीत आहेत असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रा. तुफान अवताडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तथा कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here