Home बीड पैठणचा उजवा कालवा फुटला, शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान

पैठणचा उजवा कालवा फुटला, शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान

185

 

बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114

पैठण नाथसागरच्या खालोखाल असलेल्या उजव्या कालव्याला अचानक भगदाड पडून, कालवा फुटल्याने लाखो क्युसेक पाणी शेतीत घुसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. उजव्या कालव्याचा दूरवस्था झालेली असताना, जायकवाडी प्रशासनातील शेण किड्यांनी कागदोपत्री कालवा दुरुस्तीचे धोरण ठेवल्याने भुसभुशीत झालेला कालवा रविवारी (दि.१८) फुटला. कालवा गेवराई तालुक्यातील बोरगावच्या जवळपास फुटल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी दूरध्वनी उचलला नाही. त्यामुळे, शेतीचे किती नुकसान झाले आहे. या संदर्भात अधिक माहिती मिळाली नाही.

पैठणचा उजवा कालवा शेवगाव जि. अहमदनगर, गेवराई जि.बीड या तालुक्यात जातो. ०ते १३२ किलोमीटर अंतर असलेला हा कालवा बोरगाव, मालेगाव, राक्षसभुवन, बागपिंपळगाव, धोंडराई, दैठण , तलवडा, जातेगाव मार्गै माजलगाव तालुक्यातील डॅमला जाऊन मिळतो.शेतकर्‍यांच्या शेतीला सुगीचे दिवस दाखवणार्‍या उजव्रा कालव्याची गेल्या पंधरा वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे. कालव्याचे अस्तारीकरण नाहीशे झाले आहे. मुख्य वितरीका बंद आहेत. टेल पर्यंत पाणी जात नाही. कधी काळी कालव्यातून येणारे पाणी 25 किलोमीटर परिसरात जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here