✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.19जून):-तालुक्यात मुख्यता जास्तीत जास्त जमीन उताराची असल्यामुळे शेतातील सुपीक माती सोबतच पिकासाठी टाकलेला खत पाण्यासोबत वाहून जातो त्यामुळे अंबुजा फाउंडेशन कडून 98 शेतकऱ्यांची जमीन सपाट करून दिली आहे.त्यामुळे सुपीक माती, खत आता वाहून न जाता तेच पावसाचे पाणी जमिनीत मुरणार आहे. आणि आजूबाजूला असलेल्या स्रोत्तांची पाण्याची पातळी वाढणार आहे. सोबतच उत्पनातही वाढ निश्चित होणार आहे.
अशाच प्रकारे तालुक्यातील संगणापूर,नंदप्पा ,पिट्टीगुडा कोलांडी,आंबेझरी, हिमायतनगर, बेळगाव, बुधगुडा,नागापूर, कुंभेझरी, झालीगुडा यागावंमध्ये अंबुजा फाउंडेशन जिवती यांनी मार्च ते जून मध्ये शेतकरीहिताचे, गावहिताचे उपक्रम राबविले आहेत.आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून
अंबुजा फाउंडेशन चे तालुका समन्व्यक श्री. दीपक साळवे सर हे नेहमीच जिवती तालुक्यातील शेतकरी प्रगतशील झाला पाहिजे यासाठी दिवसेंदिवस धडपड करताना दिसतात.
या उपक्रमात श्री महेश उपरे सर तसेच प्रक्षेत्र अधिकारी बालाजी नलबले अंबुजा फाउंडेशन जिवती च्या माध्यमातून सहकार्य व मार्गदर्शन तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळत आहे.