गंगाखेड (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या.वाढदिवसानिमित्त १०५५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपाचा आज दि.१५ जून रोजी गंगाखेड शहरातील प्रेरणा प्राथमिक शाळा येथे शुभारंभ करण्यात आला. दि.१५ ते जून २२ जून या सप्ताह दरम्यान शहरी व ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा मानस मनसे परभणी जिल्हा संघटक तथा राज्य उपाध्यक्ष मनशेसेना बालाजी मुंडे यांनी केला असून या सप्त्याचा शुभारंभ आज दि.१५ जून गुरुवार पासून करण्यात आला यावेळी बोलताना बालाजी मुंडे म्हनाले कि राजसाहेब ठाकरे हे नेहमीच महाराष्ट्रातील लोक हितासाठी लोककल्याणकारी व महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतात तसेच महाराष्ट्रातील मराठी शाळा टिकल्या पाहिजे जगल्या पाहिजे या उद्द्दात हेतूने त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक भावनेतून मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे, सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड जिल्हा परभणी विभागात १०५५ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ प्रेरणा विद्यालय गंगाखेड येथून करण्यात आला आहे असेच पुढील ७ दिवस शहरातील व परिसरातील शाळेत सुद्धा शालेय साहित्य वाटप करणार आहोत असे हि म्हणाले . यावेळी मनशेसेना तालुकाध्यक्ष हनुमान डबडे, शहर सचिव महेमूद शेख, उपतालुकाध्य हेमंत भोसले, रामेश्वर गायकवाड, बॉबी बोबडे, पवन सूर्यवंशी, दयानंद सावंत, गोपाळ सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्तित होते , हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बापू वाघमारे, सहशिक्षक लांडगे सर, निटुरे सर, आरबाड सर, गुंठे सर, हत्तीअंबीरे सर, हराळे मॅडम, फड मॅडम, वाघमारे मॅडम, सरोदे मॅडम, कुलकर्णी मॅडम आदीनि परिश्रम घेतले . शाळेच्या पहिलाच दिवशी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि चिमुकल्याच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत होता