शून्यातून विश्वनिर्मिती करणारे या देशात अगणित आहेत कुणी अपार कष्टातून तर कोणी विनाश्रम अशा यशाला गवसणी घालतात. टाकीचे घाव सोसून ज्यांनी यश, कीर्ती, मान बराब्बत कमावला तेच खèया अर्थाचे आदर्शाचे धनी ठरतात. मात्र हे कष्ट ज्यांच्या कुणाच्या ध्यानीमनी नसतात त्यांना या अविश्रांत परिश्रमाचे मूल्य नसते. मात्र यामुळे अशा व्यक्ती महत्त्वाचे महत्त्व तसुभरही कमी ठरत नाही ही खरी वस्तुस्थिती!
पुरुषोत्तम चौधरी हे नाव जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात उद्यान्मुखता लाभलेले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाव (कळमगाव) हे त्यांचे जन्मगाव. अठराविश्वे दारिद्रय असलेल्या शेतकरी कुटुंबातील हे अपत्य एमकॉम, बीपीएड पर्यंत प्रचंड कष्ट उपसून जिद्दीने घेतलेले शिक्षण अनेकांसाठी प्रेरक ठरेल असे पायाला भिंगरी लावून हा अवलिया शिक्षणाची भूक भागवत राहीला. इयत्ता चौथी पर्यंत स्वगावी. पाचवी ते सातवी लगतच्या कळमगावात, आठवी मेंडकी, नववी ते पदवीधर पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे, जनता कॉलेज चंद्रपूर येथे पोस्ट ग्रॅज्युएशन अशी भटकंती करीत शिक्षण पुर्ण केले. ‘कमवा आणि शिकाङ्क या तंत्राने ते पुढे पुढे जात राहिले. खरे तर हे सोपे काम नाही, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कडे, यासारखेच! कधी हातावर आणूून पाणावर खाण्याजोगी. खाजगी नोकरी सन१९८९ मध्ये लग्न झाल्यानंतर विंचवाचे बिराड पाठीवर असा कौटुंबिक प्रवास करणाèया पैकी चौधरी साहेब होते. प्रचंड मेहनत फिरत्या चाकासमान जीवन जगणारे मुसाफिर म्हणूनच त्यांनी उमेदीची वर्ष घालविली हे सत्य कुणाच्या ध्यानीमनीही नाही.
पुरुषोत्तम चौधरी साध्या व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. साधी राहणी, स्वयंत भाषा, सानथोरांचा आदर राखणारा स्वभाव, लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची धमक ही त्यांची अस्त्रे आहेत. बळेजावपणाचा मागमुसही त्यांच्यात नाही.एका लोकप्रिय दैनिकाचे संपादक, अनेक संस्थांचे अध्यक्ष व सामाजिक उंची जपणारे महनिय व्यक्ती असतानाही त्यांच्या वागण्या बोलण्यात कमालीची सौजन्यशीलता आहे. एरवी पत्रकारिता क्षेत्रात वावरणारे अनेक स्तंभ लेखकाला लाजवणारे वर्तन करताना दिसतात पुरुषोत्तम चौधरी संपादक असतानाही सन्यस्त वृत्ती बाळगून असतात. हा त्यांच्या मोठेपणाचा एक प्रकारे कळसच आहे असे आम्हास वाटते.
पुरुषोत्तम चौधरी यांचा आज वाढदिवस ५८ वर्षात ते पदार्पण करीत आहेत ध्येयाचा पाठलाग करणाèया पैकी ते आहेत. घेतलेला वसा टाकायचा नाही या धोरणामुळे त्यांची वाट दिवसा गणित प्रशस्त होताना दिसते अर्थातच यामागे त्यांचे कष्ट आहेतच.
आपल्या आजवरच्या आयुष्यात चौधरीजी नेहमी धावतच राहीले आहेत.एखाद्या कसलेल्या धावकापेक्षाही त्यांची ही धाव मोठी आहे, पत्नीची समर्थ साथ, मुलगा व दोन सुविद्य मुलींची सोबत लाभल्याने ते विनाअडथळ्यांची मात्र कष्ठार्जित असलेली शर्यत प्रचंड मन:स्ताप सहन करीत जिंकली आहे. ज्याला विजीगिषू वृत्ती म्हणतात. चौधरीजी मध्ये ठासून भरली आहे. एकाच्या मागे पडण्यात त्यांना रतीभरही स्वारस्य नाही विविध शर्यतींना सामोरे जात अंत:करणातून या शर्यतीमध्ये भल्ला प्रमाणे भिडण्याची वृत्ती असल्यानेच ते सफल व्यक्तिमत्त्वाचे धनी ठरले आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डब्ल्युसीएल प्रोजेक्ट मॅनेजर पदावर त्यांना संधी मिळाली, मात्र आर्थिक उषोपनाने या संधीला मुकावे लागले, नसीब आजमावण्यासाठी औरंगाबाद गाठत तिथेच शिका व कमवा या धर्तीवर मोटार रिवार्इंडींग, टेलीफोन ऑपरेटर प्रशिक्षण पूर्ण केले. साधारणता १९९१-९२ मध्ये पेपर बॉक्स लिमिटेड मुंबई या कंपनीत सहा महिने उमेदवारी केली. केंद्रशासित प्रदेशात बदली झाल्याने या नोकरीला रामराव ढोकला. महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी येथे शासकीय शिक्षकाची वर्षभर नोकरी, श्री. मेश्राम यांच्या ब्रह्मपुरी येथील अपंग मुलाच्या शाळेत मुख्याध्यापक पदावर दोन वर्षे सेवा केली. चंद्रपूर येथील महाराष्ट्र लँड डेव्हलपमेंट अॅन्ड इन्व्हेस्टमेंट कंपनी मध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले मात्र या उरबडव्या खाजगी नोकèयात नवी झेप घेणाèया वृतीमुळे पुरुषोत्तमजी फारसे रमले नाही, काहीतरी वेगळे हक्काचे व मालक म्हणून जगण्याच्या इर्षेने त्यांनी आपल्या प्रवासाची दिशा बदलत मार्गक्रमण केले. आणि काटेरी अशी आव्हानात्मक वाट निवडली.स्वस्त बसने स्वभावातच नसल्याने चौधरींनी २००३ मध्ये दि. न्यू. विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था (र.नं.३७८) सुरू केली. त्याच वर्षी चंद्रपूर तालुका सुशीक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था काढली, लोककलाल बहुजन शिक्षण संस्था ब्रह्मपुरी (रजिस्टड्ढेशन नंबर ११/९६महाराष्ट्र/एफ-५०८७), पहिली शाळा स्वामी विवेकानंद अपंग मुलाची निवास शाळा तळोधी (बाळापुर) ता. नागभिड येथे काढली मात्र अंतर्गत कलहामुळे बंद पडली. चिमुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूकबधिर विद्यालय ही संस्था स्वयंप्रेरणेने उघडली.मात्र सरळ मार्गी स्वभावामुळे ही शाळा ही त्यांना गमवावी लागली. कधी यश कधी अपयश अशा धबडग्यात वावरतांना चौधरींनी सन२००२ मध्ये पत्तिवारांच्या दैनिक चंद्रधून या वृत्तपत्रात लेखापाल /व्यवस्थापक पदाची जबाबदारी सांभाळली. यातही ते अवघे पाच वर्षे स्थिरावले २००५ मध्ये स्वतःचे पावर सिटी साप्ताहिक काढले व कर्म धर्म संयोगाने ज्या चंद्रधून मध्ये ते मॅनेजर होते तेच वृत्तपत्र २००८ मध्ये खरेदी करून दैनिक चंद्रधूनचे संपादक बनले.प्रतीथ यश संपादक म्हणून चौधरी आज चंद्रपूर जिल्ह्याच्या पत्रकार जगतात मानाचे स्थान मिळून आहेत. उच्च विद्याविभूषीत असल्याने एक लोकप्रिय दैनिक म्हणून त्यांनी चंद्रधूनला नावारूपास आणले आहे. या दैनिकाचे भवितव्य चौधरींच्या हातात उज्वल होणार आहे हे मात्र निश्चित! एकीकडे संपादकत्वाचे दायीत्व तर दुसरीकडे संस्थांची जाळे अशा चक्रात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले आहे. चौथ्या स्तंभाची सेवा करतानाच सामाजिक जाणीवेतून त्यांनी सन २०११ मध्ये स्वामी विवेकानंद मतिमंद मुलाचे निवास शाळा नागभिड येथे सुरू केली. त्यापुर्वी २००७ मध्ये बाबुपेठ चंद्रपूर येथे स्नेहदीप बाल संगोपन केंद्र, स्वामी विवेकानंद बालसंगोपन केंद्र ब्रम्हपूरी व २००९ मध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलाचे नागभिड इथे बालगृह उघडून रंजल्या-गांजल्यांच्या सेवेत त्यांनी स्वतः ला वाहून घेतले आहे. त्यांचे एकंदरीत कार्य हिमालयासारखे आहे. कारण या कार्यात त्यांचे अविश्रांत कष्ट व घामाच्या धारा विसावल्या आहेत आणि म्हणूनच पुरुषोत्तम चौधरी हे कर्तुत्वानांच्या रांगेतील विशिष्ट रसायन आहेत. कामाचा प्रचंड आवाका असतानाही या ध्येयशिल बापाने आपल्या अपत्त्यांना उच्चशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे केले त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या सुखदुःखांची सोबती म्हणून त्यांना धर्य देत राहिल्यानेच आपण इथपर्यंतचा प्रवास करू शकलो हे चौधरीजी अभिमानाने सांगतात. विविध सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत त्यांचा शिहाचा वाटा आहे. या व्यतिरिक्त ते दि.न्य.विदर्भ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा महासचिव आहेत. रक्तदान, महिला सक्षमीकरण, बालसंगोपन, बचत गट व महिला, बालक उत्कर्षातील त्यांचे योगदान महनिय आहे. अशा ध्येयवेड्या कर्तृत्वशिल सामाजिक कार्यकर्ते,संपादक-पत्रकाराचा वाढदिवस आहे. त्यांच्या कार्याला, जिद्दीला सलाम करतानाच परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य व अमाप कीर्ती व रंगल्या गाजल्यांची सेवा करण्याचे बळ देवो हीच मनपूर्वक शुभेच्छा!
–