✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.15जून):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कै.दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यातील विविध ठिकाणी पोलीस भरती घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील एकूण २१ विद्यार्थ्यांची यामध्ये निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशाताई विजय पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी सीमा इंदासे हिने आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या प्रशस्त ग्राउंड तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आज आम्ही यशस्वी होऊ शकल्याची भावना व्यक्त केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशाताई विजय पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.डी. ए. सूर्यवंशी यांचे आभार मानले.
यावर्षी पोलीस भरतीमध्ये भरती झालेले नामदेव कोळी, किरण शहा, मयुरी बाविस्कर, लोकेश पाटील, विष्णू पाटील, सीमा इंदासे, योगेश पाटील, तेजस पाटील, ऋषिकेश धनगर, मनोज सोनवणे, कृष्णा महाजन, जगदीश कोळी, महेंद्र पाटील, प्रकाश कोळी यांचा पोलिस भरती व बी. एस. एफ. मध्ये निवड झालेल्यांचा उपस्थित अतिथींच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. नेहमीप्रमाणेच यावर्षीही चोपडा तालुक्यातील तब्बल ४० विद्यार्थ्यांची पोलीस दल तसेच इतर क्षेत्रांमध्ये भरती झाले आहेत.
विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रशिक्षणासाठी क्रीडा संचालक सौ. के. एस. क्षीरसागर, रविंद्र पाटील, सुधाकर बाविस्कर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक सौ. के. एस. क्षीरसागर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार आर. आर. बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए. एन. बोरसे, आर. आर. बडगुजर, सौ. शिरीन सय्यद, सौ. कांचन पाटील, अतुल पाटील, अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले. यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.ए.एल.चौधरी,उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, प्रा.डॉ. के.एन.सोनवणे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस.ए. वाघ तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षक शिक्षकेतर बंधू -भगिनी यांनी हार्दिक अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.