Home महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या उपोषणाचा दणका नगरपंचायत मुख्याधिकारी शहा साहेबांनी...

भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या उपोषणाचा दणका नगरपंचायत मुख्याधिकारी शहा साहेबांनी उपोषणाच्या वेळी आमदार दादारावजी केचे साहेबांना व उपोषण कर्त्याना दिलेला शब्द पुर्ण केला

75

कारंजा (घा):-दिनांक ५ जुन पासून भारतीय जनता पक्षाचे कारंजा शहराध्यक्ष दिलीप जसुतकर, तालुका चिटणीस राणासिंग बावरी,युवा मोर्चा शहराध्यक्ष वेदांत घिमे यांनी गोळीबार चौक कारंजा येथे नगर पंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले होते. आमरण उपोषण सुरु होतात नगरपंचायत प्रशासनाला जाग आली. उपोषणकर्त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या कारंजा शहरात करिता कचरा गाडी उपलब्ध करून देणे, तसेच कचरा डेपो मधील कचऱ्याची विल्हेवाट लावणे..१७ मे रोजी पत्र देवूनही काहीही कार्यवाही करायला नगर पंचायत प्रशासन व पदाधिकारी तयार नव्हते..कचरा डेपोकरीता जागा घेवून १ वर्ष झाले तरीही काहीही काम करायला नगर पंचायत प्रशासन तयार नव्हते.. त्यामूळे ५ जुन पासुन आमरण उपोषणाला सुरुवात झाली.उपोषण मंडपाला आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे यांनी सायंकाळी भेट दिली, असता त्यावेळीं तिथे कारंजा नगर पंचायत चे मुख्याधिकारी शहा, इंजिनिअर कुंबरे, साळुंखे उपस्थीत होते.जवळपास २ तास चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर आमदार दादाराव केचे यांच्यासमोर उपोषण कर्त्यांना तसेच उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या नेते, नगरसेवक, कार्यकर्त्यांना, मुख्याधिकारी शहा यांनी लिखित आश्वासन दिले होते की, आठ दिवसांमध्ये कचरा गाडी उपलब्ध करून देणार,तसेच कचरा डेपोमधील कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावणारं असल्याचे तसेच कचरा डेपो करीता घेतलेल्या नविन जागेवर लवकरात लवकर काम चालु करणारं असल्याचे मुख्याधिकारी शहा यांनी म्हटले होते. त्याचाच प्रत्यय म्हणून दिनांक ७ जून रोजी एकलव्य ट्रेडिंग कंपनी देवळी,यांनी दोन कचरा गाडी कारंजा शहराच्या सेवेकरिता उपलब्ध करून दिल्या होत्या, तसेच दिनांक १३ जून २०२३ रोजी कारंजा नगरपंचायत नी सहा कचरा गाडी उपलब्ध करून दिल्या आहे.कचरागाडी नगर पंचायत येथे पोहोचल्या असुन आरटीओचे पासिंग झाल्यानंतर सदर कचरा गाडी कारंजा शहरातील जनतेच्या सेवेमध्ये उपलब्ध होणार असल्याचे इंजिनियर कुंबरे यांनी सांगितले.. उपोषणकर्त्यांनी तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते व नगरसेवक यांनी मुख्याधिकारी शाहा यांना धन्यवाद दिले.भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने उपोषणाला यश आलें..

उपोषण सोडविण्यामद्ये व यश प्राप्त होण्यामध्ये विकास पुरुष आमदार दादारावजी केचे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे…
तसेच उपोषणाला यश मिळाल्याबद्दल भाजपाचे कारंजा शहराचे नेते किशोर भांगे, ज्येष्ठ नेते गौरीशंकर अग्रवाल, तालुका अध्यक्ष मुकिंदा बारंगे, महीला आघाडी शहर अध्यक्षा ज्योती यावले,भाजपा नगरसेविका रमा दुर्गे, वैशाली सरोदे, रंजना ढबाले, उषा चौहाण, योगिता कदम, सुवर्णा कावडकर, नगरसेवक राहूल झोरे, हेमराज भांगे,हेमंत बन्नगरे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ धोटे, राजू काळबांडे, नरेश चाफले, राजू डोंगरे ,राजू वंजारी, विजय मांनमोडे,शैलेश घिमे, युवा मोर्चा वर्धा जिल्हा चिटणीस हेमंत धारपुरे, सुनील वंजारी, मुन्ना अग्रवाल, चक्रधर डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खवशी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश ढोबाळे ,सुधाकर दुर्गे, सुरेंद्र यावले, अजय भोकरे, शरद बोके, मुकेश टुले, निलेश मस्की, ताराचंद चाफले,संतोष काकडे ,शंकरराव कालभुत, प्रमोद चव्हाण, प्रवीण ढबाले, संजय कदम ,प्रकाश नारीगे, मनोज चापले, राष्ट्रवादीचे नेते अनिस मुल्ला सर, राहुल नायर, शंकरराव बारंगे, सुजित चौधरी, संजय बागडे,रामभाऊ प्रांजळे , स्वप्निल वाडीभस्मे, सुदीप भांगे, कैलास अग्रवाल, यांनी उपोषण कर्त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here