सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : नांदेड जिल्ह्यातील बोनडार गावातील बौध्द तरुण अक्षय भालेराव यांनी भिमजयंती साजरी केल्यामुळे जातीवादी षंढाकडुन भिमसैनिकाची निर्घृण हत्या करण्यात आली तसेच चर्नीरोड येथील दलित मुलीची हत्या झालेल्या व जातीयवादी अमानवीय नालायक शिंदे फडणवीस सरकारच्या निष्क्रीय व अकार्यक्षम कारभाराविरोधाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, जिल्हा पूर्वच्या वतीने तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन दिनांक १२ जुन २०२३ रोजी वडुज येथिल तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे करण्यात आले व सरकार विरोधात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
नालायक सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तुषार बैले यांचा नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आले
त्यावेळेस वंचितचे जिल्हा राजकीय निरीक्षक ईम्तियाज नदाफ, जेष्ठ नेते सुभाष गायकवाड अशोक बैले माण तालुका नेते बजीरंग वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वंचितचे महासचिव तुषार बैले यांनी अक्षय भालेराव यांच्यावर जातीयवादी गावगुंडानी केलेल्या भ्याड हल्ला व खुनाची साबीआई चौकशी तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मधे चालवून दोशींनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली
सध्या फक्त मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी दलीत तसेच मुस्लीम युवकांमधे हेतुपुरस्सर भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठीच सरकार हा अजेंडा राबवत आहे असा आरोप त्यांनी केला
तसेच निष्क्रीय गृहमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात थोडी जरी नैतिकता उरली असेल तर त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी केली.
सत्ताधारी तसेच प्रस्थापित पक्षातील दलित मुस्लीम तरुणांनी त्याच्या पक्षातील मालकांना त्यांनी ह्याविरोधात आवाज का नाही उठवला याचा जाब विचारण्याचे आवाहन केले.
यावेळी मोर्चात अभिजीत सरतापे, संग्राम कांबळे, कुणाल रायबोळे, नितीन नलावडे, अभय नलावडे, सचिन कांबळे, अर्जुन भालेराव, नितीन जगताप, आप्पा खुडे, महादेव सकट, सज्जाद शेख, माजीद खान, वसंत मिसाळ खटाव तालुक्यामधील असंख्य दलित मुस्लीम व बहुजन समाजातील कार्यकर्ते यावेळी ऊपस्थित होते
या आंदोलनाला खटाव तालुका राष्ट्रवादीचे डॅा महेश माने व तालुका अध्यक्ष त्यांच्या पत्नी डॅा सौ माने यांनी पाठींबा दिला व सहभागी झाले