Home गडचिरोली नेहरू युवा केंद्र आणि शिवकल्याण संस्थेचा वतीने विश्व सायकल दिवस साजरा ...

नेहरू युवा केंद्र आणि शिवकल्याण संस्थेचा वतीने विश्व सायकल दिवस साजरा सायकल रॅलीत सहभागी होऊन युवकांनी जागर केले सायकलचे महत्त्व

72

 

गडचिरोली:: विश्व सायकल दिवसाचे औचित्य साधून मिशन लाईफ अभियाना अंतर्गत नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्यान युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन संस्थे च्या पुढाकारातून नेहरू युवा केंद्र गडचिरोली चे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली येथील कोटगल ते ITI चौक पर्यंत सायकल रॅली काढून विश्व सायकल दिवस साजरा करण्यात आला.
या सायकल रॅलीत मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग नोंदविला व सायकलच्या महत्त्वांना उजागर केले. मानवाचे आयुष्य हे सायकल प्रमाणे आहे पुढे जायचे असेल तर पैडल मारावा लागतो. त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या समतोल राखण्याकरिता व शारीरिक सुदृढतेसाठी सायकलचा वापर करणे काळाची गरज असल्याचा संदेश या सायकल रॅलीतून देण्यात आला.
सायकल रॅलीत शिवकल्याण संस्था अध्यक्ष अनुप कोहळे, गौरव कोल्हटवार, अमित नस्कूलवार, मार्शल उराडे, धनराज कोवे, मुन्ना नस्कुलवार, पियुष ठाकरे, संकेत सम्रर्थ, प्रणय मेश्राम, प्रवीण कांबळे, शुभम गुजरकर, चेतन ठाकरे, करण कोलते, टारझन बुटकावार, प्रथमेश आरेवार,धर्मेंद्र गोटेवार, विवेक कोरेवार, आर्यन मडावी, गौरव मादेश्वर, ओमकार बलंमवार सह मोठ्या संख्येने कोटगल येथील युवक रॅलीत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here