Home चंद्रपूर बोरगाव बुट्टी येथील युवकाचा विद्युत करंट लागून मृत्यू.

बोरगाव बुट्टी येथील युवकाचा विद्युत करंट लागून मृत्यू.

95

 

चिमूर.=

तालुक्यातील बोरगाव बुट्टी येथील आदित्य चंद्रभान घरत (वय १३ वर्ष) हा आपल्या शेतात विहिरीतील मोटार पंप ने पाणी करीत असतांना करंट लागून त्याचा मृत्यू झाला.
शवविच्छेदन करण्यासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.
आंबेनेरी आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे संचालक तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चा सहसचिव चंद्रभान घरत यांना दोन मुले असून त्यांनी त्यांच्या शेतात लहानशा बगीचा असतांना पाणी देण्यासाठी दोघेही भाऊ शेतात गेले. पाणी करीत असताना आदित्य चा स्पर्श विद्युत मोटार लागल्याने करंट लागला . तेव्हा जवळ असलेल्या मोठा भाऊ अमर ने काठी मारून त्यास अलग केले.नंतर भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणल्यावर चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता आदित्य ने प्राणज्योत जाऊन मृत्यू झाला. आदित्य हा वर्ग ७ वित असून शासकीय आश्रमशाळा जांभूळघाट येथील विद्यार्थी आहे.आदित्य च्या मृत्यू ने हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here