बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी
पुसद -“रक्तदान वाचवी रुग्णाचे प्राण” आरोग्यविषयक अनेक समस्या व अपघात यामुळे देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा यवतमाळचे सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे राज्य युवा सहकार्यवाह, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबत विविध कार्यक्रमात सहभाग, पर्यावरणस्नेही एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट वक्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) समतादुत या पदावर सामजिक न्याय विभाग येथे कार्यरत असलेले यवतमाळ येथील रुपेश वानखडे यांनी दिनांक ०३/०६/२०११ रोजी एका गरजूला रक्ताची खूप आवश्यकता होती. तेव्हा त्यांनी कसलाही विचार न करता त्या गरजुवंत व्यक्तीला रक्तदान दिले. तो दिवस म्हणजे रुपेश वानखडे यांचा जन्मदिवस तेव्हापासून त्यांनी असा संकल्प केला की आपल्या रक्तदानामुळे एक जीव वाचला तेव्हा आपण आपल्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त रक्तदान करुन वाढदिवस साजरा करायचा असा संकल्प केला आणि तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत आपला हा संकल्प अखंडपणे चालू ठेवला आहे.
या वर्षी यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्त पेढी येथे जन्मदिनाच्या औचीत्याने रक्त दान केले आणि आतापर्यंत १३ वेळा रक्तदान झाले.
तसेच त्यांनी संकल्प केला आहे की आपले स्वास्थ जेव्हापर्यंत निरोगी राहील तेव्हापर्यंत रक्तदान करुण आपला संकल्प पूर्ण करणार आहेत. तसेच त्यांनी इतरांना देखील आवाहन केले की, आरोग्यविषयीच्या अनेक समस्या देशामध्ये निर्माण होत असताना आपण सुद्धा आपल्या परिने इतरांना जे काही सहकार्य करता येईल ते करून आपला संकल्प पूर्ण करावा.