रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपूरी(दि. 3 जून):-
दिनांक 02 जुन 2023 रोज शुक्रवारला एस. एस. सी. परीक्षा मार्च 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत निरुपा विद्यालय रुई ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील एकूण प्रविष्ट 53 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत विद्यालयाचा 94.33% टक्के निकाल लागला असुन यामध्ये बरडकिन्हीची कु. आरती रमेश तुपट हिने 82.60% टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला.तर बरडकिन्हीचीच कु. कांचन मनोहर मिसार हिने 81.60% टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला.तर कु. करिश्मा हरिदास कांबळे हिने 76.80% टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला.
तर वेदांत जीवन बनकर – 76.00%, कु. माधवी पवनलाल कसारे – 76.00%,शैलेश सुनील सहारे – 76.00% ,कु. जोत्सना दिवाकर ठाकरे- 75.80%,कु. प्रियंका प्रकाश मेश्राम-75.60%,
कु.मयुरी मधुकर निकोडे 75.40% इ. विद्यार्थ्यांनी प्राविण्य संपादन करून शाळेची यशोगाथा कायम ठेवली.
गुणवंत विद्यार्थ्यांचे निरुपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. गोकुलदासजी बालपांडे साहेब यांचे हस्ते सत्कार करण्यात आला आला.यावेळी रामलाल महादेव दोनाडकर तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका तथा माजी सभापती ब्रम्हपूरी,भाष्कर तिजारे सर माजी मुख्याध्यापक,प्रमोद ठाकरे सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती रुई तसेच विद्यार्थ्यांचे माता पिता उपस्थित होते.
निरुपा विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.पुरुषोत्तम धोंगडे सर, शाळेतील सर्व शिक्षक वृंद सुनिता राऊत मॅडम, भागवत लंजे सर,सुधा बावनकुळे मॅडम, नरेश मडावी सर व शिक्षकेतर कर्मचारी रमेश मेश्राम यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.