Home महाराष्ट्र बार्टीत बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना-महासंचालक वारेंची हकालपट्टी करा

बार्टीत बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना-महासंचालक वारेंची हकालपट्टी करा

74

पुणे- बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचून समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. मात्र,त्याच बार्टीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासमोर देवदेवतांची गाणी वाजवून त्यावर नाचण्याचा नीट हलकटपणा बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. यामुळे बाबासाहेबांच्या विचारांनी विटंबना झाली असून वारेंची महासंचालकपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी आंबेडकरी जनतेने केली आहे. बार्टीतून उजव्या विचासरणीला खतपाणी घालण्याचे काम होत आहे.
देशातील जनतेला अभिमान वाटावा,असे बार्टीने कार्य केले आहे. येथे आलेल्या कोणत्याही महासंचालकाने बाबासाहेबांच्या विचारांनी पडताना करण्याचे धाडस कोणी केले नाही. मात्र चार तीन महिन्यापूर्वी रुजू झालेले महासंचालक सुनील वारे यांनी बार्टीची ऐसीतैसी केली आहे. येरवडा येथील समतादुतांच्या कार्यशाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासमोर ‘गोविंद बोलो’ या गाण्यावर महासंचालक सुनील वारे निर्लज्जपणे बेभान नाचले. आपण महासंचालक आहोत, याचे साधे भानही या अधिकाऱ्याला राहिले नाही. गेल्या काही दिवसांपासून बार्टीमध्ये काही अधिकाऱ्यांनी नंगानाच सुरू केला आहे. विशिष्ट समाजाच्या कर्मचाऱ्यांना नोकरी टाकून आपल्या हाती एकहाती सत्ता मिळविण्याचा प्रयत्न येथील निबंधक इंदिरा अस्वार करीत आहेत. नसरीन तांबोळी या महिला कर्मचाऱ्याला बिनकामाची असा शिक्का मारून कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र, निबंधक इंदिरा अस्वार यांनी पुन्हा त्यांना कामावर घेतले. त्यांना कामावर घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची विटंबना करण्याचे काम सुरू केले आहे. याकामी महासंचालक सुनील वारे संमती देत असून त्यांच्याच पुढाकाराने बार्टीत हा लाजीरवाणा प्रकार घडला आहे.
राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देऊन व त्यांना बाहुले बनवून घेण्याचा प्रकार हे अधिकारी करीत असून त्यामुळेच त्यांची हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा प्रकार दिसून आल्यानंतर आंबेडकरी विचारवंतामध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे. याविरोधात राज्य शासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे आंबेडकरी जनतेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here