Home चंद्रपूर भिसी – जांभुळघाट मार्गावर असलेल्या पारडपार फाट्यावर अवैधरित्या ट्रक ची सील तोडून...

भिसी – जांभुळघाट मार्गावर असलेल्या पारडपार फाट्यावर अवैधरित्या ट्रक ची सील तोडून दगडी कोळशाची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू दगडी कोळशाचा साठा हा गोकुल खदानीचाच मायनिंग अधिकारी व पोलीस प्रशासन झोपेत

107

सह संपादक //उपक्षम रामटेके 📱9890940507

चंद्रपूर : – चिमूर तालुक्यातील भिसी – जांभुळघाट मार्गावर असलेल्या पारडपार फाट्यावर मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा याची साठवणूक करण्यात आली असून दिवसा व रात्रीच्या वेळी अनेक ट्रकच्या माध्यमातून या कोळशाची अफरातफर केली जात असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
उमरेड चिमूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला उमरी फाटा रोड वर गेल्या मागील अनेक महिन्या पासून काळ सोन समजल्या जाणाऱ्या दगडी कोळस्याची साठवणूक अवैद्य रित्या केली जात आहे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी दिवसा व रात्री अवैधरित्या कोळसा उतरविण्यात येत असुन पहाटे दुसऱ्या ट्रक या वाहनाच्या माध्यमातून दगडी कोळसा लंपास केला जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे.भिसी पोलीस प्रशासन यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात असमर्थ ठरत आहे.त्याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही आहे. यामुळे पोलिसांची या कोळसा माफियांसोबत हात मिळवणी तर नाही ना ? असा प्रश्नार्थक चिन्ह जनतेसमोर निर्माण झाला आहे.रात्रीच्या अंधारात या ठिकाणी भरलेल्या ट्रक मधून कोळसा उतरविण्यात येत असून उर्वरित कोळशावर जांभुळघाट जवळील शेतातील मोटार द्वारे पाईपणे पाणी मारुन वजन वाढविले जात आहे. साठवणूक केलेला कोळसा दुसऱ्या ट्रक मध्ये टाकून लंपास सुद्धा केल्या जात आहे. हा दगडी कोळसा नांद गावातील गोकुल खदानीचा असल्याची दाट चर्चा मोठ्या प्रमाणावर नागरिकांत आहे. उमरी फाट्या जवळ उच्च प्रतीचा कोळसा मोठ्या प्रमाणात आहे. कमी दरात किलो च्या भावाने ट्रक वाल्याकडून वजन करून घेऊन साठवनुक करून जास्त दराने विक्री सुरू आहे. याकडे संबंधित विभागाने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून या आधी वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्गावर खडसंगी व वाहानगाव च्या मधोमध असलेल्या ठिकाणी कोळशाचा साठा जमा होत होता काही वृत्तपत्रा मध्ये याबाबत बातम्या प्रकाशीत करण्यात आल्या त्या ठिकाणी पोलीसांनी धाडसत्र राबवून कारवाई न करता चिमूर जवळ उमरी फाट्यावर स्टॉल लावण्यास सांगितले अशी माफियांच्या माध्यमातून दबक्या आवाजात माहिती प्राप्त झाली होती.त्याठिकाणी सुध्दा हा अवैध कोळसा व्यवसाय जोमाने सुरू होता परंतु याबाबत सुध्दा वृत्तपत्रात तसेच वेब पोर्टल वर बातमी प्रकाशित करताच तोही व्यवसाय त्याठिकानावरून बंद करण्यात आला. परंतू चिमूर पोलिसांनी सुद्धा यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून सर्व अधिकारी यांची बांधनुक या कोळसा माफिया यांनी केली आहे. असेही हे माफिया सर्वांना सांगत फिरत असतात असे असतांना सुद्धा महसूल विभाग चिमूर , तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , जिल्हाधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष देऊन असल्या कोळसा माफियांवर गुन्हेगारी प्रवृत्तीची कारवाई करून साठ – गाठ असणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here