Home चंद्रपूर विद्युत विभागाला एनबीए मानांकन- शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या शिरपेचात मनाचा तुरा

विद्युत विभागाला एनबीए मानांकन- शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या शिरपेचात मनाचा तुरा

102

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाला ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन’ (एनबीए) समितीकडून तीन वर्षासाठी (सन २०२६ पर्यंत) मानांकन प्राप्त झाले असल्याने संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर एनबीए मानांकनाला फार महत्त्व आहे. शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीमधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या शाखेला तीन वर्षासाठी मानांकन मिळाले आहे. एनबीए ही संस्था राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रमांना मानांकन देण्याचे काम करते. समितीने २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीची शिक्षण प्रणाली, सर्व सुविधा, विभागस्तरावरील कागदपत्रांची तपासणी केली होती. यामध्ये प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता व उपलब्धता, टीचिंग-लर्निंग प्रोसेस, रिसर्च अॅण्ड कन्सल्टन्सी, स्टुडंट सक्सेस रेट, करिअर गाइडन्स, प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, परिणामात्मक शिक्षण (आऊटकम बेस्ड एज्युकेशन) याचे सर्वकष मूल्यमापन केले. त्याचबरोबर विविध कार्यशाळा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, ऑफिस, जिमखाना, कॅन्टिन, विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्ट, अशा सर्व बाबींची कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. आता एआयसीटीईच्या विविध योजना – अर्थसहाय्य, संस्थेचे भविष्यातील विकासाच्या योजना ही संस्था नवीन जोमाने पूर्ण करेल असा विश्वास संस्थेचे प्र. प्राचार्य डॉ. अनिल पावडे यांनी व्यक्त केला. संस्थेचे माजी प्राचार्य डॉ. धर्मपाल शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मूल्यांकन पार पडले. संस्थेचे एनबीए समन्वयक तथा विभागप्रमुख डॉ. धनंजय पर्बत, विद्युत विभागाचे प्र. विभाग प्रमुख प्रा. जयंत बोरकर, अधिव्याख्याता प्रा. सुमित जयस्वाल, प्रा. संघर्ष पिल्लेवान, प्रा. शरद दांडगे, प्रा. रोहित वळीवे तसेच प्रा. अश्विनी रायपुरे, प्रा. संदीप बगमारे, डॉ. भूषण अंबादे, डॉ. केमल कोचे, प्रा. राम शर्मा, प्रा. नितीन पोटे, कार्यालय प्रबंधक श्री. धीरजशहा मडावी, श्रीमती नम्रता नवरंगे, तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, विद्यार्थी, पालक व संस्थेचे माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळणे शक्य झाले आहे. तसेच मूल्यांकनासाठी डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यासह नागपूर विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे, शा. तं. गोंदिया येथील प्राचार्य डॉ. गोळघाटे व विभागप्रमुख डॉ. गोतमारे शा. तं. नागपूर येथील विभागप्रमुख डॉ. आवारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here