सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : पारधी समाज तसा मागासलेला समाज या समाजाकडे पाहताना सुद्धा संशयने पाहिले जाते अज्ञाने समाजाची प्रगती तशी फारच कमी ना रहायला धड घर चांगले ना निवांरा उपजीविकेच म्हणाले तर फारच विचित्र परिस्थिती परंतु या प्रतिकूल परिस्थिमध्ये सुद्धा पंधारे गावच्या कमलेशने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नुकत्याचं झालेल्या पोलीस भरतीमध्ये परीक्षेत पास होत थेट मुबंई पोलीस दलातच आपली नियुक्ती मिळवली आणि यशाला गवसनी घातली.
कमलेश राहुल भोसले पंधारे या गावाचा पारधी समाजातील मुलगा यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळा या ठिकाणी आठ वर्ष म्हणजेच पहिली ते आठवी असं शिक्षण पूर्ण केले त्यानंतर श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा साखरवाडी येथे दहावी पूर्ण केली व त्यानंतर vp कॉलेजमध्ये अकरावी बारावी शिक्षण पूर्ण केले. पारधी समाजातील असून अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले कमलेश स्वतः शिक्षण घेत सेंट्रींग च्या कामावर, कोंबड खताची पोती व्हायला,लग्नात जेवण वाढायला असे खूप काम करत असे अश्या बिकट प्रसंग असूनही परिणामी तरीही जास्तीत जास्त मेहनत घेऊन सुद्धा कमलेशने शिक्षणाची कधी आस सोडली नाही,
यावेळी कमलेशने सांगितले कित्येक वेळा वाटते की सोडून द्यावे बस पुढे काय होणार नाही शिकून फायदा नाही आणि असे कित्येक जणांनी सांगितले की नोकरी मिळत नाही शिकून फायदा नाही तरी मी माझे लक्ष कधीच विसरलो नाही आई-वडिलांची जान त्यांचे कष्ट त्यांनी घेतलेले माझ्यासाठी परिश्रम असे डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या कष्टाची एक रुप राहिलो.
हे फक्त माझ्या एकट्याचेच कस्टमर माझे परिवार माझे मित्र माझे गुरुजन वर्ग आणि असे अनेक लोकांमुळे मी सध्या या पोलीस खात्याशी जोडलो गेलो. मी तीन वर्षे होमगार्ड केले व त्यानंतर पोलीस भरती झालो.
कमलेश म्हणाला आज आमच्या समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आज जरी वेगळा असला तरी येणाऱ्या काळात हा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचे महत्व समजावून सांगणार असून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या आणि आरक्षणाच्या माध्यमातून समाजातील मुले जास्तीत जास्त प्रयत्नशील असणार आहे येणाऱ्या काळात एम पी एस सी आणि यू पी एस सी च्या परीक्षा देत राहणार आहे
त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरानी कमलेशचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसं शुभेच्छा दिल्या.