Home यवतमाळ पंजाब डख व माधवराव पाटील शेळगावकर यांच्या मार्गदर्शनात शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे...

पंजाब डख व माधवराव पाटील शेळगावकर यांच्या मार्गदर्शनात शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचा पुढाकार

60

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 23 मे )बदलत्या हवामानामुळे हल्लीच्या काळात शेतकऱ्यावर वेळोवेळी संकट ओढवल्या जात आहे.

यावर्षी उन्हाळ्यात वीस दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात परिस्थिती काय राहील यासाठी खरीप हंगामा अगोदरच शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख व शेतकरी नेते तथा स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात दिनांक 26 मे शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी मार्गदर्शन मेळावा व चर्चासत्राचे आयोजन गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, प्रमुख अतिथी म्हणून विभागाचे आमदार नामदेव ससाने तर स्वागत अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे उपस्थित राहणार आहेत.

यासोबतच प्रमुख उपस्थिती मध्ये प्रकाश पाटील देवसरकर – माजी आमदार, उत्तमराव इंगळे – माजी आमदार, विजयराव खडसे – माजी आमदार , राजेंद्र नजरधने – माजी आमदार, तातू देशमुख – काँग्रेस प्रदेश सरचिटणीस, नितीन भुतडा – भाजपा जिल्हाध्यक्ष यवतमाळ , रामदास पाटील सुमठाणकर – भाजपा हिंगोली लोकसभा प्रभारी, प्राचार्य मोहनराव मोरे, डॉ. अंकुश देवसरकर – संचालक भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चितांगराव कदम – मा. जि प सदस्य , डॉ. विजय माने – अधिष्ठाता यवतमाळ, गोपाल अग्रवाल – संचालक पुसद अर्बन बँक, राजूभैय्या जयस्वाल – माजी नगराध्यक्ष, ऍड. संतोष जैन – माजी नगरसेवक, बाळासाहेब चंद्र पाटील – सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, कृष्णा पाटील देवसरकर – माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, विजयराव नरवाडे – अध्यक्ष खरेदी विक्री संघ , डॉ. व्यंकट राठोड – उपविभागीय अधिकारी, प्रदीप पाडवी – उपविभागीय पोलीस अधिकारी , आनंद देऊळगावकर – तहसीलदार, महेशकुमार जामनोर – मुख्याधिकारी नगर परिषद, प्रवीणकुमार वानखेडे – गटविकास अधिकारी पंचायत समिती, अमोल माळवे – पोलीस निरीक्षक, सतीश खेडेकर – वाहतूक शाखाप्रमुख, गंगाधर बळवंतकर – तालुका कृषी अधिकारी, अतुलकुमार कदम- कृषी अधिकारी पंचायत समिती, एस. एस. पांडे – वनपरिक्षेत्र अधिकारी , डॉ. एम. बी. कदम – प्राचार्य गो. सी. गावंडे महाविद्यालय, धम्मपाल मुनेश्वर – तालुका आरोग्य अधिकारी, प्रमोद दुधे – उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, विवेक जोशी – जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, डॉ. अविनाश खंदारे – अध्यक्ष उमरखेड तालुका दैनिक पत्रकार संघ, सोनू खतीब – जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शेतकरी मार्गदर्शन मेळावा व चर्चासत्र कार्यक्रमाकरिता तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ चे अध्यक्ष निळकंठ धोबे, सचिव लक्ष्मीकांत नंदनवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here