Home यवतमाळ युवकांनी प्रशिक्षण व अनुभव घेतल्याशिवाय व्यवसाय करू नये- डॉ. विजय माने ...

युवकांनी प्रशिक्षण व अनुभव घेतल्याशिवाय व्यवसाय करू नये- डॉ. विजय माने [स्वराज्य रक्षक संभाजी महाराज जयंती निमित्त पोवाडा कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध]

79

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि.15 मे)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्य टिकवण्यासाठी स्वराज्य रक्षक राजे संभाजी महाराज स्वराज्याचे रक्षण केले यांच्या जयंती निमित्त दि 14 मे रोजी येथील माहेश्वरी खुले नाट्यगृह येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ विजय माने यांनी बोलताना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम सर्वांना माहीत असणे हे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे.

तर युवकांनो कुठलाही व्यवसाय करण्यापूर्वी प्रशिक्षण व अनुभव घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नये असे प्रतिपादन केले मराठा क्रांती भवन बांधण्यासाठी मराठा युवा मंच यांनी जो कार्य हाती घेतला आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहेत असे मत व्यक्त केले.

स्थानिक जेठवलजी खुलेनाट्यगृहात शिवशाहीर देवानंद माळी नाशिक यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम मराठा युवा मंच प्रणित संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने ठेवण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विजय माने ,कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष सतीश नाईक, प्रमुख उपस्थिती आमदार नामदेव ससाने तर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी अर्थ व बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, माजी नगराध्यक्ष राजू भैया जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते कैलास राठोड, राजू खामनेकर , प्रियंका चौधरी, विनोद जैन, सरोज देशमुख ,दत्तदिगंबर वानखेडे ,एड जितेंद्र पवार, अंबादास धुळे मंचावर उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण करत विविध ग्रंथ लिहिले त्यांनी केलेल्या कार्याचा युवा पिढीने आदर्श घेऊन धर्मसत्ता, राज्यसत्ता आणि प्रचार प्रसार मिळविण्याच्या दृष्टीने युवकांनी कार्य करावे या उदात्त हेतूने मराठा युवा मंच उमरखेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 14 मे रोजी सायं .7 वाजता पोवाडयाचा कार्यक्रम आयोजित केला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक रामभाऊ देवसरकर यांनी बोलताना मराठा युवा मंचच्या तरुणांनी हाती घेतलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत समाजातील युवकांना अण्णासाहेब पाटील महामंडळ या योजनेमार्फत युवकांना कर्ज उपलब्धता होण्यासाठी फार जाचक अटी असल्यामुळे त्या सुलभ करून देण्याकरिता आमदार ससाणे यांनी शासन दरबारी प्रयत्न करावे तसेच मराठा युवा मंचच्या तरुणांनी घरावर तुळशीपत्र ठेवून मराठा क्रांती भवन बांधण्याचा जो निर्धार केला आहे जो क्रांती भवन बांधण्यात येणार आहे.

सर्वप्रथम त्याचा उलघडा समाजासमोर केला पाहिजे त्यानंतर संपूर्ण सकल मराठा समाज क्रांती भवन बांधण्याकरिता हात मोकळे करेल .या क्रांती भवनाचा संपूर्ण समाजातील युवकांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वस्तीगृह, अभ्यासिका, प्रशिक्षण केंद्र या माध्यमातून त्यांचा फायदा होईल तसेच मराठा क्रांती भवन बांधण्यासाठी सकल मराठा बांधवांनी हात मोकळे करावे असे आवाहन यावेळी राम देवसरकर यांनी केले.

मराठा युवा मंच यांनी उमरखेड येथे मराठा क्रांती भवन बांधण्याचा जो निश्चय केला आहे निश्चितच तो निर्णय अतिशय आदर्शवादी ,प्रेरणादायी असल्याचे आमदार ससाने यांनी सांगितले

या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ .विवेक पत्रे व डॉ विशाल गिरी तसेच राज्यात खुले वाचनालय सुरू करणाऱ्या भूमिपुत्री प्रियंका चौधरी यांना औदुंबर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

उमरखेड तालुक्यातील व शहरातील सर्व शिवप्रेमीं, शंभू प्रेमीं व बहुजन समाज कार्यक्रमाला उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संदीप गाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठा युवा मंच प्रणित छत्रपती संभाजी राजे जन्मोत्सव समितीचे सचिव रविराज धबडगे यांनी केले
कार्यक्रमाचे शिष्यवृत्तीसाठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गजानन चौधरी सचिन घाडगे गोपाल कलाने नितीन शिंदे अमोल वानखेडे सह मराठा युवा मंच प्रणित छत्रपती संभाजी राजे जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here