Home महाराष्ट्र दलीत वस्तीतील निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याची गुणवत्ता नियंत्रक विभागाकडून चौकशी करून कोरकटिंग...

दलीत वस्तीतील निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याची गुणवत्ता नियंत्रक विभागाकडून चौकशी करून कोरकटिंग चाचणी करा

77

✒️सिद्धार्थ दिवेकर जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.14 मे):-ढाणकी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील सिमेंट रस्त्याचे व नालीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून सदर रस्त्याचे व नालीच्या कामाची चौकशी गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून करून रस्त्याची कोर कट तपासणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी तथा प्रशांत विणकरे यांनी ढाणकी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

ढाणकी नगरपंचायत अंतर्गत दलीत वस्ती प्रभाग क्रमांक तीन मधित म सिमेंट रस्ते व नालीचे बांधकाम काही दिवसापूर्वी करण्यात आले.

त्यातील माधव अलकटवाड यांच्या दुकानासमोरील सिमेंट रस्त्याचे बेड एकाच पावसात उघडे पडले असून गिट्टी बाहेर पडली आहे.

त्याचप्रमाणे श्याम टेलर यांच्या दुकानासमोरील मुख्य रस्ता सुद्धा अंदाजपत्रकाला बगल देत बनवला गेला आहे, दोन्ही सिमेंट रस्ता व नालीच्या बांधकामात स्टील सिमेंट गिट्टी व रेतीचा कमी प्रमाणात वापर करून थिकनेस कमी करून यात गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे,नमूद केलेल्या दोन्ही रस्त्याच्या व नालीच्या बांधकामाची चौकशी गुणवत्ता नियंत्रक विभाग यांच्याकडून करण्यात यावी.

तसेच रस्त्याची व नालीची कोर कटिंग टेस्ट करून तपासणी करून निकृष्ट कामास दोषी असणाऱ्यावर कार्यवाही करून, रस्त्याचे व नालीचे पुन्हा नव्याने दर्जेदार पद्धतीने सिमेंट रस्त्याचे व नालीचे बांधकाम करण्यात यावे , सदरील सिमेंट रस्त्याच्या व नालीच्या बांधकामाची चौकशी नगरपंचायत प्रशासन व गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून पंधरा दिवसाच्या आत न झाल्यास वंचित बहुजन आघाडी कडून स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here