पंकज रामटेके, विशेष प्रतिनिधी
घुग्घुस- येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रविवार, १४ मे रोजी छोटया दुकानदारांना नि:शुल्क छत्रीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, लोकनेते, विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस शहरात जे उन्हात बसून व्यापार करणारे २०० छोटे छोटे दुकानदार आहे त्यांना नि:शुल्क छत्रीचे वाटप करण्यात येत आहे.
छोटे छोटे जे दुकानदार आहे ते रस्त्यावर बसून सध्याच्या तीव्र उन्हात व्यापार करीत आहे. ही छत्री त्या दुकानदारांची उन्हापासून संरक्षण करणार आहे.
यावेळी भाजपाचे बबलू सातपुते, सुनील बाम, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, शाम आगदारी व छोटे दुकानदार उपस्थित होते.