सांगोला/ प्रतिनिधी – सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, विज्ञान महाविद्यालय, सांगोला येथे रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव श्री. श्रीनिवास येलपले (सर) यांनी केले. त्यानंतर पाहुण्यांची ओळख माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन डॉ. नारायण आदलिंगे यांनी केली. चेअरमनच्या मनोगतानंतर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. संतोष राजगुरू यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला विकास कसा करावा हे सांगितले. राजगुरू सर यांच्यानंतर महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी प्रा.सौ. विद्या शिंदे अनगर कॉलेज, अनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाची पार्श्वभूमी व महाविद्यालयातील माजी विद्यार्थांनी मिळवलेले यश याचा थोडक्यात आढावा घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. विलास कोळेकर जिल्हा निबंधक वर्ग-१ यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेवर जास्त भर द्यावा असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात मा.श्री. दादासाहेब अनुसे उद्योगपती राज उदयोग समूह यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी व्यवसाय कसा करावा हे स्वतःचे उदाहरण देऊन सविस्तर सांगितले. कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचलन प्रा. किसन पवार यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. दिपक शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ऑनलाईन व टेक्निकल विभागासाठी डॉ. जे. व्ही ठोंबरे व श्री मोईन कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
हा मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन डॉ. नारायण आदलिंगे, माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव श्री. श्रीनिवास येलपले (सर), माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद पवार, माजी विद्यार्थी समितीचे सदस्य प्रा. किसन पवार, डॉ. दिलीप कसबे, डॉ. जगन्नाथ ठोंबरे, प्रा.बाळासाहेब सरगर, प्रा.जावेद शेख, प्रा.दिपक शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.