Home चंद्रपूर वडाळा ( तु ) येथील रोहयो कामगारांच्या अल्टिमेट ची दखल-भद्रावती तालुक्यात रोहयोचे...

वडाळा ( तु ) येथील रोहयो कामगारांच्या अल्टिमेट ची दखल-भद्रावती तालुक्यात रोहयोचे काम सुरू भद्रावती तालुक्यात पहिल्याच आठवड्यात १९५० मजुरांना मिळाले काम

78

 

उपक्षम रामटेके, सहसंपादक, मो 98909 40507
भद्रावती:- चालु वर्ष हे रोहयो संबंधित कर्मचारी व अधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या संपाने गाजले. अशातच मागणी करुनही कामापासून वंचित ठेवत असल्याने तालुक्यातील वडाळा(तु) येथील कामगारांनी *मागणीनुसार काम द्या नाहीतर बेरोजगार भत्ता द्या* या मागणीसाठी मा.तहसिलदार भद्रावती यांचे कडे अर्ज देऊन ८ मे पर्यंत काम सुरू करण्याचा अल्टिमेट दिला. त्या अल्टिमेटची दखल घेऊन तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे ११मे पासुन सुरू करण्यात आल्याने रोहयो कामगारांनी समाधान व्यक्त केले असुन रोहयो यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले आहे.
तालुक्यात जुलै ते आक्टोंबर शेतीचा हंगाम असतो. त्यानंतर नोव्हेंबर ते जुन या कालावधीत मजुरांना रोहयोच्या कामाची खरी गरज असते. त्यामुळे तालुक्यातील रोहयो कामाची मागणी नुसार यंत्रणेने नोव्हेंबर पासून कामाला सुरुवात केली. डिसेंबर पर्यंत काम सुरळीत चालले. मात्र नविन वर्षाचे सुरवातीला ग्रामरोजगार सेवक यांचा संप. त्यानंतर यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा संप. तो संपताच ग्रामसेवक यांचा संप. तहसिलदार यांचा संप आणि आता संवर्ग विकास अधिकारी यांचा संप. असे या वर्षाचे प्रारंभापासून चार महीने सतत संपाने जात असल्याने वेळोवेळी रोहयो काम बंद असल्याने कामगारांना रोहयोच्या कामापासून वंचित राहावे लागले. गावात हक्काचे इतर कोणतेही काम उपलब्ध नसल्याने इतर ठिकाणी कमी पैशात काम करणे, कामासाठी बाहेर गावी जाणे, कामाचे शोधात वनवन भटकणे, कुटुंबांचे स्थलांतर करणे, बेरोजगार राहणे अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या परिस्थितीला त्रासुन वडाळा तु. येथील रोहयो कामगारांनी रोजगार हमी कायद्यानुसार नमुना ४ भरुन त्यात २० फेब्रुवारी ते ३० जुन २०२३ पर्यंत कामाची मागणी केली होती. परंतु संपाचे कारण दाखवून सततच्या काम बंदमुळे काम मिळवण्याचे दिवस कमी होत असल्याने *मागणीनुसार काम द्या नाहीतर बेरोजगार भत्ता द्या* या मागणीसाठी मा.तहसिलदार भद्रावती यांना दिनांक ४/५/२०२३ रोजी पत्र देऊन बंद असलेले रोहयो चे काम ८ मे पर्यंत सुरू न केल्यास बेरोजगार भत्ता मंजूर करुन कामगारांचे बैंक खात्यावर जमा करा असा अल्टिमेट देण्यात आला. त्या पत्राच्या प्रतिलिपी संवर्ग विकास अधिकारी भद्रावती व सामाजिक कार्यकर्ते शंकर भरडे वडाळा यांना देण्यात आल्या. या अल्टिमेट ची दखल तहसिलदार अनिकेत सोनावणे भद्रावती, संवर्ग विकास अधिकारी डॉ.मंगेश आरेवार पं.स. भद्रावती यांनी घेऊन ११ मे पासून तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत चे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे पहील्याच आठवड्यात काम सुरू करण्यात आलेल्या तालुक्यातील वडाळा तु, आष्टा, चंदनखेडा, वायगाव, विलोडा, चोरा, काटवल, टेकाडी, कोंढेगाव, मुधोली, विलोडा या सारख्या गावांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामुळे तालुक्यातील १९५० कामगारांना पहिल्याच आठवड्यात काम उपलब्ध झाले. त्यात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुरज खाडे, चंद्रकांत दलाल, तांत्रिक सहाय्यक अतुल खंडाळे, सुनील पारोधी, डाटा एंट्री ऑपरेटर मिलिंद लोणारे, विशाल सुर्वै आणि विस्तार अधिकारी श्री पारखी साहेब यांचे योगदान आहे.

—–
रोहयो कामगारांच्या पत्राची दखल घेऊन मा.तहसिलदार अनिकेत सोनावणे व मा.डॉ.मंगेश आरेवार यांनी तालुक्यातील कामगारांना काम पुरविण्यासाठी जे धाडस दाखविले ते खुपचं महत्वाचे आहे. जानेवारी महीण्यापासुन सुरु असलेल्या विविध संपामुळे रोहयो कामगारांची विस्कटलेली आर्थीक घडी पुर्वरत आणण्यासाठी शेतीचा हंगाम सुरू होईपर्यंत रोहयोच्या नियमित कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यात रोहयो यंत्रणेचीही सकारात्मक भुमिका महत्वाची ठरणार आहे.- शंकर भरडे, सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here