नाशिक शांताराम दुनबळे (जिल्हा प्रतिनिधी)
नाशिक-: जमीन खरेदी विक्री फसवणुक गुन्ह्यात नाव वगळण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी ४ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नाशिक शहरातील उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की आ. सुहास कांदे हे एन. डी. सी. सी. बँकेचे उपाध्यक्ष असताना एका महिलेने काही इसमांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दि. १० नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल केला होता. शिला सावंत या महिलेची महात्मानगर येथिल मिळकतप्रकरणी बनावट महिला ऊभी खरेदी करत फसवणुक केल्याची तक्रार शिला सावंत यांनी गगांपुर पोलिसात केली होती, या गुन्ह्यात अतुल भंडारी व फरहान खान याचें कडे कांदे याना आरोपी न करण्यासाठी निलेश माईनकर यांनी चार लाख रुपये द्यावे लागेल असा निरोप दिला होता तर ह्याच गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-२ चे तत्कालीन पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर हे करीत होते. नीलेश माईनकर यांनी गुन्ह्यातील आरोपींना भीती दाखवून मला आरोपी करून विनाकारण या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिल्याचे कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
त्यादरम्यान, मला अटक होऊ नये यासाठी योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबत होतो. तरीही या गुन्ह्याशी माझा वैयक्तिक कोणताही संबंध नसताना या गुन्ह्यात २३ डिसेंबर २०१६ रोजी समजपत्र देऊन पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे मला या गुन्ह्यात अटक होऊन माझ्या राजकीय कारकीर्दीस धोका निर्माण होऊ नये म्हणून मी जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज केला होता. त्यानुसार मला कोर्टाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला होता. त्यानंतर मी तपास अधिकारी माईनकर यांच्या म्हणण्याप्रमाणे चौकशीकामी त्यांच्या समक्ष हजर राहून माझा जबाब दिला होता, असेही कांदे यांनी म्हटले आहे. नीलेश माईनकर यांनी मला धमकी देऊन व ब्लॅकमेल करून माझ्याकडे चार लाख रुपयांची मागणी केल्याने दि. ७ जानेवारी २०१७ रोजी तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे ९ जानेवारी २०१७ रोजी वरीष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल होण्यासाठी अर्ज दिला असल्याचे सुहास कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे; परंतु वेगवेगळ्या खात्यांकडे तक्रारी देऊनदेखील तेच तपासी अधिकारी असल्याने वेळोवेळी त्यांनी मला “माझ्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुला केसेसमध्ये पुरता अडकवीन,” अशा धमक्या देऊन दबाव आणत बेकायदेशीर रकमेची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सर्व गोष्टींची शहानिशा करून सुहास कांदे यांना दोषमुक्त केले होते. उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाल्याने कांदे यांनी माईनकर यांच्याविरुद्ध सी. आर. पी. सी. कलम 156 (3) अन्वये न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश कोर्ट नं. ६ यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माईनकर यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 384, 385, 389 सह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 13 प्रमाणे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ करीत आहेत. माईनकर यांना महाराष्ट्रदिनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पदक मिळाले होते. त्यानंतर त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यापाठोपाठ गंभीर स्वरूपाच्या प्रकरणावरून माईनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Home Breaking News नाशिकचे उपनगर वरीष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर विरोधात गगांपुर पोलिसात खंडणीचा गुन्हा...