Home महाराष्ट्र सत्यशोधक विश्व धम्म परिषद 7 मे रोजी कोल्हापूरात सिने अभिनेते मिलिंद शिंदे...

सत्यशोधक विश्व धम्म परिषद 7 मे रोजी कोल्हापूरात सिने अभिनेते मिलिंद शिंदे उदघाटक तर धम्मसंगिती जीवन गौरव विजया कांबळे यांना जाहीर

91

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुध्दांच्या धम्म विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत. तथागत बुध्दांच्या विचारांचा जागर करण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर (महाराष्ट्र) या ठिकाणी लोकराजे राजर्षी शाहुंच्या नागरीत रविवार दि. 7 मे 2023 रोजी सकाळी 11:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत बुद्ध जयंतीच्या निमित्ताने एक दिवसीय सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेसाठी देशभरातून 1000 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व परिषदेच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी दिली.
या परिषदेसाठी उदघाटक म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद शिंदे (मुंबई), बीजभाषक म्हणून विचारवंत प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड (जे. एन. यु. दिल्ली), अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय नेते माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे, धम्म अभ्यासक भदंत आर आनंद थेरो, भदंत एस संबोधी थेरो, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे (कर्नाटक), डॉ. पद्माकर तामगाडगे (मुंबई) भूपाल शेटे (कोल्हापूर), डॉ. सुरेश वाघमारे (लातूर), डॉ. सोमनाथ कदम (कणकवली) विश्वनाथ कांबळे (कोल्हापूर) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीचा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टचा मानाचा, स्वाभिमानाचा, अभिमानाचा व धम्म चळवळीला गतिमान करणारा धम्मसंगिती जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ धम्म अभ्यासिका विजया कांबळे यांना तर सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा ब्रँड ऑफ महाराष्ट्रा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आयकर सल्लागार डॉ. शंकर अंदानी यांना जाहीर झाला असून या परिषदेच्या स्वागताध्यक्षा धम्मलिपीच्या अभ्यासिका छाया धर्मदत्त पाटील या आहेत.
या विश्व परिषदेमध्ये सायंकाळी 6:00 वाजता बुद्ध कि राह पर हा प्रबोधनपर गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या कार्यकामाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांची असून निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शक विश्वनाथ कांबळे हे आहेत तर राकेश कोले, संजय काळे, सागर मौर्य, स्वप्निल बेले भास्कर चव्हाण, अमृता गौडदाब, वैदही जाधव संगीतकार प्रदीप जिरगे निवेदक अभिजीत म्हासुर्लीकर यांचा यात महत्वाचा सहभाग आहे.
सत्यशोधक विश्व धम्म परिषदच्या अनिल म्हमाने, डॉ. नंदकुमार गोंधळी, ॲड. मंचकराव डोणे, प्रा. अमोल महापुरे, डॉ. शोभा चाळके, ॲड. अकबर मकानदार, प्रा. दादासाहेब ढेरे, चंद्रकांत सावंत, विमल पोखर्णीकर हे असून परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिषद प्रचंड संख्येने यशस्वी करावी असे आवहान समन्वयक डॉ. निकिता खोबरे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला आयेशा काझी, विमल पोखर्णीकर, अनघा सुतार, अनिल म्हमाने, आरिफ काझी, नामदेव मोरे, रुपेश कुसुरकर, केतन घोरपडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here