Home चंद्रपूर पक्षाचे विरोधात काम करणारे खेमराज तिडके यांची अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा-नानाजी तुपट...

पक्षाचे विरोधात काम करणारे खेमराज तिडके यांची अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा-नानाजी तुपट (जेष्ठ कार्यकर्ता कांग्रेस) ब्रम्हपुरी काँग्रेस कमिटीतील अध्यक्ष व जेष्ठ काँग्रेस कार्येकर्ते यांच्यातील वाद चव्हाट्यावर….!

166

 

रोशन मदनकर (उप संपादक),मो. 88886 28986
ब्रम्हपुरी ( दि. 2 मे ) :-
नुकताच झालेल्या ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणनुकी साठी काँग्रेस पक्षाचे 18 उमेदवार उभे करण्यात आले. या निवडनुकीत नानाजी तुपट यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता. परंतु आमदार विजय वडेट्टीवार यांच्या आदेश्यानुसार नानाजी तूपट यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणनुकीच्या शेवटच्या दिवशी दि. 26 एप्रिल 2023 वडसा येथे सभा व स्न्हेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. नानाजी तूपट तेथे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सभेला उपस्थित होते. सभा संपल्या नंतर आमदार विजय वडेट्टीवार निघून गेले व त्या नंतर ब्रम्हपुरी कॉग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके हे नानाजी तूपट जवळ येवून धमकी देऊ लागले, मीच तुझी तिकीट कापली. मी म्हणेन तसा या पक्षात होईल व निवडणूक झाल्याबरोबर तुझा कॉंग्रेस कृषी सेलचा अध्यक्ष पद येत्या 30 तारखेला काढतो व दिलेली गाडी वापस घेतो. तु पक्षाशी गद्दारी करतोस अशी धमकी मला दिली. त्या वरून दोघात वाद झाला आणि दुसऱ्या दिवशी नानाजी तूपट यांनी पदावरून राजीनामा दिला. पक्षाशी नेहमी एकनिष्ठ आहो म्हणूनच आमदार वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार नानाजी तूपट यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसता असे असताना सुद्धा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी नानाजी तूपट यांच्या राजीनाम्यावर काल एक प्रेसनोट काढली व विनाकारण बदनाम करण्याच्या दृष्टीने, विनाकारण पक्ष विरोधी काम करतात म्हणून आरोप केले. तसे तर पक्ष विरोधी काम स्वतः खेमराज तिडके यांनी केलेला आहे. निवडणनुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पासून ते फार्म विड्रॉल करण्याच्या तारखेपर्यंत 15 दिवस खेमराज तिडके यांच्या फार्म हाउस वर सभा व सहभोजनाचा कार्यक्रम रोज रात्रो राहायचे. त्यात तालुक्याचे सर्व नेते, पदाधिकारी सभेमध्ये मतदारांना समजावून सांगण्याकरिता स्टेज भाषण देण्यात येत होते. परंतु तालुक्यातील माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला या सर्व गोष्टी पासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना सभेला बोलविण्यात येत नव्हते. ही निवडणूक पक्षाची नव्हती का?
मग अश्या नेत्यांना सभेला न बोलविणे हा खेमराज तिडके यांचा पक्ष विरोधी काम नाही का? तसेच सहकार गटाचे उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी खेमराज तिडके यांचे कडे होती तर ग्रामपंचायत गटाचे निवडून आणण्याची जबाबदारी माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर व प्रभाकर (सोनू) नाकतोडे अध्यक्ष सरपंच संघटना ब्रम्हपुरी यांच्या कडे होती. यांनी जबाबदारी पार पाडून 4 उमेदवार निवडून आणले परंतु ग्रामपंचायत गटाचे उमेदवार उमेश धोटे यांना पाडण्यासाठी खेमराज तिडके यांनी निवडणुकीच्या 4 दिवस पूर्वी कॉंग्रेस च्या सर्व नेत्यांची बैठक घेवून उमेश धोटे यांना पाडण्यासाठी त्यांच्या शिकवणी पत्रीकेवर अंगठी या चीन्हासमोर (X) चिन्ह मारून प्रती वोट 1000 रुपये प्रमाणे मतदारांना उमेश धोटे यांना मतदान करू नका असे आदेश आमदार विजय वडेट्टीवार यांचे आहे असे ग्रामपंचायत मतदारांना धमकावून तालुक्यातील सर्व नेत्यांना हाताशी धरून कॉंग्रेस च्या उमेदवारांना खुलेआम पाडण्याची भाषा वापरणारे तालुका अध्यक्ष यांची भूमिका पक्ष विरोध नाही का? ब्रम्हपुरी तालुक्यात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात असून सुद्धा खेमराज तिडके हेतू पुरस्कर कुणबी समाज नेतृत्वाला थांबविण्यासाठी अश्या प्रकारचे कॉंग्रेस पक्षात दुफळी व जातीय तेढ निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न खेमराज तिडके यांच्या कडून होत आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यात कॉंग्रेस पक्षाला घातक ठरणाऱ्या खेमराज तिडके अध्यक्ष काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी यांचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद काढून त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. अशी मागणी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते नानाजी तुपट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here