अमरावती प्रतिनिधी : कामगार दिन व भूषण सरदार यांच्या वास्तव काव्यसंग्रह प्रकाशन निमित्त प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा मंगरूळ चव्हाळा ( नांदगाव खंडेश्वर ) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा संचालक मतीन भोसले हे होते. तसेच उदघाट्क म्हणून सकाळ वृत्तपत्राचे नागपूर विभागीय संपादक प्रमोद काळबांडे सर हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये ब्लू टायगर संघटना संस्थापक अध्यक्ष तथा हाय कोर्ट वकील ऍड.सुधीर एच तायडे, खुशाल डहाक, चित्रपट निर्माते नितीन काळबांडे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या फोटोचे हारर्पण व पूजन करण्यात आले. नंतर प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेंच सकाळ वृत्तपत्राचे नागपूर विभागीय संपादक प्रमोद काळबांडे यांच्या हस्ते भूषण सरदार यांच्या वास्तव काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यांनतर भूषण सरदार या कवीने आपण कसे घडलो आणि साहित्य,कविता ,गझल यामुळे व्यवस्थेत कसा बदलावं घडवता येतो यावर आपले मनोगत व्यक्त
केले. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार मांडले. यावेळी वक्त्या म्हणून लाभलेल्या प्रमोदिनी अनिरुद्ध मुंदाने व वक्ते उत्तम सुरनार यांनी मार्गदर्शन केले. तसेंच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जगदीश गोवर्धन यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला ऍड. मकेश्वर,संदेश तायडे,अन्ना पुंडकर,राष्ट्रपाल घरडे, रामभाऊ गवई, ऍड. तातड,दिनेश थोरात,हेमंत देशमुख,नमिता भोसले, सौ.सिमा मतीन भोसले, विनोद सर्वटकर, आर्यमेघ सरदार इत्यादी अनेक कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उमेश पवार, रामप्रसाद क्षीरसागर, अजय काळबांडे ( माध्यमिक शिक्षक), ओंकार पवार ( मुख्याध्यापक प्राथमिक), प्रशांत गोरामन, प्रगती प्रशांत गोरामन, अधीन भोसले,आर. मतीन भोसले,सुभाष ,राजेंद्र पवार ,अलकेश शेळके, विनोद इत्यादी अनेक जणांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला गावातील असंख्य लोकं उपस्थित होते.