Home महाराष्ट्र व्हाईस ऑफ मिडिया रेडिओ विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमोल देशमुख यांची निवड

व्हाईस ऑफ मिडिया रेडिओ विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमोल देशमुख यांची निवड

68

 

जळगाव : देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या रेडिओ विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जळगाव येथील पत्रकार आर.जे. अमोल उत्तमराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दि. 30 एप्रिल 2023 रोजी बीड येथे मराठवाडा विभागीय अधिवेशनात नियुक्तीपत्र देऊन अमोल देशमुख यांची निवड केली आहे.
अमोल उत्तमराव देशमुख हे जळगाव येथील रेडिओ मनभावन येथे संचालक आहेत, ते गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. सूचना प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा देण्यात येणारा थिमेटीक नॅशनल अवार्ड २०१८ हा त्यांच्या नेतृत्वात वर्धेतील रेडिओला मिळाला होता .
मागील तेरा वर्षांपासून समाजातील प्रत्येक घटकाला रेडिओशी जोडण्याचं काम ते करत आहेत.
व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, सरचिटणीस चंद्रमोहन पूप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने, ग्रामीण प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के आदींनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी देशमुख यांना दिली आहे. बीड येथिल विभागीय अधिवेशनात त्यांना संदीप काळे, मंदार फणसे, विलास बडे व इतर पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र बहाल केले.
यावेळी मंचावर राष्ट्रीय सचिव दिव्या पाटील, विजय चोरडिया, साप्ताहिक विंग चे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, प्रदेश कार्याध्यक्ष गजानन धामणे आदीसह राज्य पातळी वरील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नियुक्ती पत्र देतांना राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले की, अमोल देशमुख यांच्या माध्यमातून देशातील रेडिओ व एकूणच खाजगी रेडिओ क्षेत्रातील पत्रकार व कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वास संदीप काळे यांनी व्यक्त केला.
यावेळी नियुक्ती प्रसंगी बोलतांना अमोल देशमुख म्हणाले की, देशभरातील सर्व रेडिओ स्टेशन व खाजगी रेडिओ केंद्रात कार्यरत असलेले रेडिओ जॉकी व इतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आजतागायत आम्ही कुठल्याही संघटनेशी एकरूप झालेलो नव्हतो. मात्र, सकारात्मक दृष्टीने पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी झपाट्याने कार्य करणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून आम्ही रेडिओ दोस्तांचे प्रश्न मार्गी लावणार आहोत. लवकरच विविध राज्यातील राज्याध्यक्ष व सर्व जिल्ह्यातील कार्यकारीण्या गठीत करुन काम सुरु करणार असल्याचे मनोगत नियुक्ती प्रसंगी बोलतांना देशमुख यांनी व्यक्त केले. त्यांच्या निवडीचे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार तसेच रेडिओ श्रोत्यांनी कौतुक केले आहे.

[

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here