Home महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी तालुक्याच्या दोन ता-यांची रुपेरी पडद्यावर चमक मांगलीचा अमर...

यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी तालुक्याच्या दोन ता-यांची रुपेरी पडद्यावर चमक मांगलीचा अमर नामदेव सातघरे व अडेगावचा अविनाश चंदनकर

185

 

सुनील शिरपुरे/झरीजामणी

वैदर्भीय निर्मात्यांनी साकारलेला ‘बेरा:एक अघोरी’ हा हॉरर चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असून यातील गाण्यांच्या रिल्सची सोशल मीडियावर देशभरात धूम सुरु आहे. झरीजामणी तालुक्यातील मांगली येथील अमर नामदेव सातघरे या युवकाला लहानपासूनच आपल्या कुटुंबाकडून अभिनयाचा वारसा लाभला. कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करण्याची जिद्द, प्रत्येक कार्यात उल्लेखनीय कामगिरी मग ते लहान पटांगणातील क्रिकेट असो कि चित्रपट सृष्टीतील कथा. नेहमीच स्वतःच्या जोरावर, स्वकर्तुत्वाने आपले लक्ष गाठने हे एकमेव ध्येय साधलेल्या युवकाची नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उघड्या डोळ्याने स्वप्न पाहणारे तथा संपूर्ण भारतात आपला ठसा उमटविण्याच्या दृष्टीने अतुलनीय कार्य करणारे आमचे मित्र तथा बंधू सन्माननीय अमर नामदेवराव सातघरे (अभिनेता) बेरा: एक अघोरी (चित्रपट) याने अभिनेत्याच्या मित्राची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला. रुपेरी पडद्यावर झळकने हे अतिशय असामान्य बाब आहे. अमरसाठी व त्याच्या आई वडिलासाठी ही बाब आनंदाची, गौरवाची व समाजासाठी अभिमानाची बाब आहे व समाजातील तरुणासाठी प्रोत्साहनात्मक बाब आहे.

तसेच अडेगाव या छोट्याशा गावाचा २७ वर्षीय अविनाश चंदनकर. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्याचे वडील गोवर्धन चंदनकर शिवणकाम करून घर चालवतात. अविनाश चंदनकर म्हणजे अष्टपैलू, कलाप्रेमी व्यक्तिमत्त्व. बालपणापासूनच त्याला सर्वजण आपला सुपरस्टार म्हणून ओळखतात. अविनाशला अभिनयात, चित्रकलेत, कविता, कथा, गीत लिखानात, गायनात बालपणापासूनच प्रचंड आवड आहे आणि अजुनही तो कलेला जपतो. अविनाशने अनेक नाटके स्वतः लिहून बसवले आणि त्यात अभिनय केला. पल्याड या मराठी चित्रपटात पण तो सर्वांना दिसला. सद्या अविनाश नाट्यशास्त्र विषयात मास्टर करत आहे. अभिनय क्षेत्रात अविनाशने पाऊल टाकले असून धिराल एंटरटेनमेंटद्वारा प्रस्तुत, राजू भारती निर्मित हा चित्रपट शुक्रवार २८ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून शक्तिवीर धिराल, प्रेम धिराल आणि प्राजक्ता शिंदे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. सहाय्यक अभिनेता म्हणून अविनाश चंदनकरने रॉकी नावाची सुंदर भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बहुतांश कलावंत विदर्भातील आहेत. अमर व अविनाशचा अभिनय पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. भविष्यात अमर व अविनाशला चित्रपट क्षेत्रात अजून खूप उंच भरारी घ्यायची आहे. त्यासाठी या दोघांना भावी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here