चिमूर –
देशात भाजपा सरकारने महागाई वाढवून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. खाद्य तेलासह पेट्रोल, डिझेल चे भाव आकाशाला भिडल्याने गरीब कुटुंबातील जनतेला कौटुंबिक तथा सामाजिक कार्यक्रम करणे अवघड जात आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस चे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी विविध उपक्रम राबवून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या लग्नकार्याचे सिजन सुरू असुन ज्या कुटुंबातील लग्नकार्य असते त्यांच्यासाठी मंगलमय सोहळा असला तरी खर्चाचा मेळ बसवतांना दमछाक होते. याप्रसंगी आपला थोडाफार हातभार लागावा या उदात्त हेतुने ३५ वर्षीय दिवाकर निकुरे यांनी लग्नकार्यासाठी खाद्यतेलाचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवुन सामान्यांच्या हृदयात एक भावनिक स्थान निर्माण केली आहे.
याच अभियानाचा एक भाग समजुन चिमूर येथील “आधार” बंगल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक भरत बंडे यांच्या हस्ते व पुरोगामी विचारमंच चे संयोजक सुरेश डांगे, प्रा. राजु रामटेके, किशोर शिवरकर यांच्या उपस्थितीत खाद्य तेलाचे वाटप करण्यात आले. यावेळी कवडशी (देश.) येथील राजेंद्र तुकाराम नन्नावरे, केवाडा(पेठ) येथील बापुजी सोनूले, संजय सुधाकर सदनपवार, चंद्रकला देविदास बोरकर मोटेगाव, अशोक गोंगल पांजरेपार, दिवाकर बीजाराम भोयर खंडाळा यांना खाद्य तेल मिळताच त्यांनी दिवाकर निकुरे यांचे आभार व्यक्त केले.