पंकज रामटेके, विशेष प्रतिनिधी
घुग्घुस -शहरात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात तसेच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे तसेच मन की बात प्रमुख संजय तिवारी यांच्या मार्गदर्शनात रविवार, ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ११ शक्तीकेंद्रावर मन की बात कार्यक्रम संपन्न झाला.
मन की बात चा आज शताब्दी महोत्सव असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांशी संवाद साधणाऱ्या मन की बात कार्यक्रमाच्या आज ३० एप्रिलला शंभराव्या भागाचे प्रसारण सकाळी ११ वाजता करण्यात आले.
हा ऐतिहासिक क्षण देशभर मोठया उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याची तयारी भाजपाने केली होती.
त्याअनुषंगाने घुग्घुस शहरात शतप्रतिशत ११ शक्तीकेंद्रावर मन की बात कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, साजन गोहने, सिनू इसारप, राजेश मोरपाका, बबलू सातपुते, मल्लेश बल्ला, विनोद चौधरी, विनोद जंजर्ला, शरद गेडाम, प्रवीण सोदारी, रत्नेश सिंग, श्रीकांत सावे, विक्की सारसर, संजय भोंगळे, विवेक तिवारी, हेमंत पाझारे, सतीश बोन्डे, सुरेंद्र जोगी, तुलसीदास ढवस, स्वप्नील इंगोले यांनी प्रयत्न केले.
यावेळी मोठया संख्येत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.