मुंबई / चक्रधर मेश्राम .
आपल्या भारत देशात 2014 पासून नरेंद्र मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यामुळे मनुवाद्यांनी तोंड वर काढले आहे. मनुवादी हागता — मुतता भारताला हिंदू राष्ट्र करा या देशाला हिंदू राष्ट्र करणार , हा देश हिंदु राष्ट्र आहे.अशी मनुवादी लोक गरळ ओकत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर 15 जानेवारी 2018 ला सुरेंद्र सिंग mp युपी यांनी 2024 पर्यंत भारत हिंदू राष्ट्र बनणार आहे असे सांगितले होते.17 जून 2022 ला शंकराचार्य निच्छला नंद सरस्वती हे रायपूर दौऱ्यावर असतांना त्यांनी माध्यमा समोर सांगितले होते, भारत एक हिंदू राष्ट्र आहे.16 फेब्रुवारी 2023 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते की, भारत हिंदू राष्ट्र होते,आहे आणि राहणार आहे. तर धीरेंद्र शास्त्री बागेश्वर हे उठता बसता खुले आम हिंदू राष्ट्राच्या नावावर भुंकत असतात . त्यांना हिंदू राष्ट्र नावाचा मुळव्याध, महारोग झाला की काय असे वाटते .आपल्या देशात जवळ पास 10 प्रमुख धर्म आहेत. त्यात प्रामुख्याने शिख,ख्रिश्चन, मुसलमान,बौद्ध,जैन,ईसाई,पारसी, जु, यहुदी इत्यादी धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदाने राहत असतात.या धर्मातील एखाद्या व्यक्तीने किंवा त्यांच्या धर्मगुरूंनी या देशाला मुस्लिम राष्ट्र करा , या देशाला शीख राष्ट्र करा, या देशाला बौद्ध राष्ट्र करा, या देशाला जैन राष्ट्र करा, या देशाला ख्रिश्चन राष्ट्र करा , असे जर म्हणाले असते तर मनुवाद्याच्या ….डीला मिरच्या लागल्या असत्या व दिवसाढवळ्या त्यांचा खुलेआम गोळ्या घालून खून केला असता.हिंदू राष्ट्राच्या बाबतीत जेव्हा आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते. त्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजेच 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान वेगळे राष्ट्र उदयास येऊन त्यांनी स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित केले होते. तेव्हा कलकत्त्याचे उद्योगपती बी.एम.बिर्ला यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना पत्र लिहुन सांगितले होते की पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित केले आहे.आता भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यास काय हरकत आहे ? तेव्हा सरदार वल्लभाई पटेल यांनी उद्योगपती बी.एम.बिर्ला यांच्या पत्राला उत्तर देताना सांगितले होते.जर भारताला हिंदू राष्ट्र घोषित केले तर पहिल्यांदा आपल्याला जम्मू-काश्मीर वरील दावा सोडून द्यावा लागेल त्यानंतर भारताला हिंदू राष्ट्र केलेच तर भारतातील केरळ,मिझोराम,पंजाब, तामिळनाडू,नागालँड पांडेचेरी व इतर 3 ते 4 राज्ये सामील होणार नाहीत. म्हणजेच देशाचे 7 ते 8 तुकडे पडतील हे केंव्हाही भारताला हिंदू राष्ट्र करणे परवडणार नाही असे स्पष्ट सांगितले होते.असे असतानाही देशाला हिंदू राष्ट्र करा म्हणणे म्हणजे देशाच्या लोकांना भावनिक करून आपली मताची तिजोरी भरणे होय.भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचल्या नंतर व भारतीय संविधान भाग 3 fundamental rights अर्थात मुलभूत हक्क मधील Right to freedom of religion अर्थात धर्म स्वातंत्र्याचा हक्क आर्टिकल 25, 26 ,27, 28 बघितल्या नंतर हे सिद्ध होते की आपले संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे.धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ आपले संविधान कोणत्याही धर्माला विरोध करित नाही.कोणत्याही धर्माचे समर्थन करत नाही, पण प्रत्येक व्यक्तीला आप आपल्या धर्मा नुसार आचरण करण्याचा, उपासना करण्याचा व धर्माचा प्रसार व प्रसार करण्याचा अधिकार देत असते.म्हणून आज पर्यंत आपल्या देशातील 29 राज्ये 8 केंद्रशासित प्रदेश 10 धर्म 7500 हजार जाती शेकडो भाषा,परंपरा रिती रिवाज यांना एका माळेत गुंफण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. अन्यथा जगातील इतर देशाची अवस्था बघा जे धर्मावर आधारित राष्ट्र झाले आहे.उदारणार्थ पाकिस्तान,ईरान, अफगाणिस्तान व नंतर नेपाळ ने स्वतःला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले आहे.
5 एप्रिल 2023 रोजी साध्वी प्राची यांनी संविधानात बदल करून देशाला हिंदू राष्ट्र करणार असे सांगितले होते.त्या डोक्यावर पडलेल्या बाईला सांगायचे आहे की, कधी भारतीय संविधान वाचले आहे का ? भारतीय संविधान भाग 20 Ambedment of the constitution अर्थात संविधानात फेरबदल अनूच्छेद 368 नुसार संसदेला संविधानात काही अनुच्छेदाची अदला बदल करायची असेल तर पहिल्यांदा त्यांनी संविधानाच्या मुलभूत ढांचाला धक्का लावता कामा नये. संसदेने मूलभूत ढाच्याला जर धक्का लावला तर संसदेने केलेला कायदा सुप्रीम कोर्ट तात्काळ रद्द करेल असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या 13 न्यायधिशांच्या खंडपीठाने 24 एप्रिल 1973 ला केशवानंद भारती प्रकरणात दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय अनुच्छेद 141, 142 नुसार भारताचा कायदा असतो. धर्मनिरपेक्षपणा हा भारतीय संविधानातील मूलभूत ढाच्याचाच भाग आहे.समजा या देशाला हिंदू राष्ट्र केले तर त्यामुळे संविधानाच्या मूलभूत ढाच्याला तडा जाणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट तो निर्णय तात्काळ रद्द करेल हे मनुवादी विचारांनी पिसाळलेल्या साध्वी प्राची व इतर लोकांना कोणी सांगावे? संविधानातील अनुच्छेद 14 नुसार प्रत्येक धर्मातील नागरिक हे कायद्या समोर समान आहेत.असे असताना 14 जुलै 2022 रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे दोन संशयित मुस्लिम युवकांना बिहार पोलीसांनी पकडले होते.त्या मुस्लिम युवकांची पोलीस चौकशी करत असताना त्या चौकशीमध्ये ते युवक 2047 मध्ये भारताला इस्लामिक राष्ट्रीय बनविण्याची तयारी करत असल्याचे आढळले होते.म्हणून त्यांना पोलीसांनी अटक केली होती. त्याच धरती वर हिंदू राष्ट्राचे मागणी करणाऱ्या धर्मांध हिंदुत्व वाद्यांना तात्काळ तुरुंगात टाकावे अन्यथा देशात राष्ट्रीय एकता व एकात्मता धोक्यात येऊन देशात अराजकता माजेल. हे थांबवायचे असेल तर यापुढे कोणी धर्मांध राष्ट्रीय एकात्मतेला तडा देण्याची भाषा करीत असेल , देशात फुटीरतेची बीज पेरत असेल तर अशा …घाल्याची मस्ती जिरवण्याची ताकद संविधानात आहे.पण संविधाना बरोबरच संविधान राबवणारे सुद्धा मर्द असणे गरजेचे आहे. अन्यथा संविधान राबविणारे नपुंसक असतील तर त्याचा दोष त्याच्या नपुंसकतेला द्यावा संविधानाला नाही.