सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
यवतमाळ/दारव्हा- (दि. 29 एप्रिल)
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा दारव्हा यांच्या वतीने तथागत गौतम बुध्द यांच्या 2567व्या जयंतीनिमित्त सम्राट अशोक बुद्धविहार अंबिका नगर दारव्हा येथे दि.1 मे 2023 पासुन ते दि.5 मे 2023 पर्यंत बाल श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिरातील बाल श्रामणेर 50 शिबिरार्थीं राहणार आहेत.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय शाखेकडून संघनायक म्हणून पूजनीय भन्ते बुद्धपालजी, चैत्यभूमी मुंबई, सहसंघनायक म्हणून भन्ते चंद्रमनी आणि भन्ते बुद्धपुत्र अकोला, शिबिरासाठी केंद्रीय शिक्षक म्हणून रवींद्र दारोकर गुरुजी अकोला यांची नियुक्ती झाली आहे. शिबिराचे उदघाटन दि 1 मे 2023 रोजी सायंकाळी ठीक 7 वा होणार आहे.
शिबिराचे उदघाटक म्हणून रवी भगत (जिल्हाध्यक्ष यवतमाळ) हे उपस्थित आहेत.
दि. 5 मे बुध्द जयंती निमित्त सकाळी 9 वाजता रॅली काढण्यात येणार आहे.व दुपारी 12 वाजता शिबिराचा समारोपीय कार्यक्रम होईल. त्यानंतर भोजनादानाचा भव्य कार्यक्रम होईल.
यामध्ये बालश्रामनेर, समता सैनिक दल, उपासक -उपसिका तसेच पुरोगामी विचारांच्या मंडळीनी शुभ्र वस्त्र परिधान करुन सर्वांनी सहभागी व्हावे तसेच बाल श्रामनेर शिबिराच्या यशस्वीतेसाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दारव्हा चे वतीने करण्यात आले आहे.