Home अमरावती अभिनेत्री रुपाली सिरसाट यांचा संघर्षमय प्रवास-दिग्दर्शक भूषण सरदार यांच्याशी चर्चा

अभिनेत्री रुपाली सिरसाट यांचा संघर्षमय प्रवास-दिग्दर्शक भूषण सरदार यांच्याशी चर्चा

182

 

अमरावती (प्रतिनिधी ): रुपाली नागनाथ सिरसाट यांचा संघर्ष सामान्य माणसाला प्रेरणा देणारा व जीवनात खचून न जाता लढायला बळ देणारा आहे. तालुका परळी जिल्हा बीड येथील रहिवाशी रुपाली सिरसाट यांच्या घरात कोणीही डायरेक्टर नाही,कोणीही ऍक्टर नाही, कुठलाही फिल्म जीवनाशी संबंध नाही तरीही रुपाली सिरसाट यांची आवड,त्यांची मेहनत,त्यांची जिद्द यामुळे त्यांना सुरुवातीला कॉलेज जीवनात एक शॉर्ट फिल्म करायला संधी मिळाली. ( Pad वर्सेस Bad) ही त्यांची पहिली शॉर्ट फिल्म. तसेच दिग्दर्शक भूषण सरदार यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की आता त्यांचा दबंगगीरी या चित्रपटाची शूटिंग चालू आहे. इच्छा असली आणि मेहनत करायची तयारी असली की कोणतीही गोष्ट अशक्य नसते असा त्यांचा अनुभव. भविष्यात एक मोठं ध्येय गाठून सामान्य माणसाला चित्रपट सृष्टीत संधी मिळावी,त्यांच्या कलेला व्हावं मिळावा यांसाठी त्या प्रयत्न करणार आहेत असे भूषण सरदार यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितले. लवकरच त्यांचा दबंगगिरी हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे असे रुपाली सिरसाट यांनी सांगितले व या चित्रपटात त्यांची आगळी वेगळी भूमिका दिसणार आहे. रुपाली सिरसाट यांनी दिग्दर्शक भूषण सरदार यांचा समाजिक जीवनावर ब्रँड या येणाऱ्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भूषण सरदार यांनी सुद्धा भविष्यात रुपाली सिरसाट यांना अनेक चित्रपटात संधी मिळावी,काम मिळावं व त्यांच्या हातून एक मोठं काम घडावं यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here