पुसद-बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी
पुसद – जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही यश पदरात पाडून घेता येते हे दाखवून दिले आहे पुसद तालुक्यातील
वेणी (खुर्द) येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान( उमेद )तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पुसद अंतर्गत असलेल्या प्रगती महिला ग्रामसंघाच्या सदस्या तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील मीना सावंत महिला या महिलेचे पती मजुरी करणारे असुन मजुरी सुद्धा अल्प प्रमाणात होती. मीना सावंत यांना सात वर्षाचा एक मुलगा आहे. त्यांची अभ्यास करण्याची जिद्द , चिकाटी ,व मेहनत आणि पतीच्या संपूर्ण पाठबळांमुळे त्या रोज सकाळी ६ वाजता पुसद येथे अभ्यास व सराव करण्यासाठी येत होत्या. पैसे अभावी खूप अडचणी आल्या. यामध्ये मीना सावंत याना उमेद अभियानातून सी.आय.एफ तसेच बँक कर्ज यामधून मदत मिळाली त्यामुळेच महाराष्ट्र राज्य पोलीस यवतमाळ येथील भरती निवड प्रक्रियेची यादी नुकतीच जाहीर झाली असून या निवड प्रक्रियेमध्ये त्यांचे नाव आले आहे .
त्यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे .तसेच पंचायत समिती पुसद येथील झुणका भाकर केंद्र येथे मीना सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका व्यवस्थापक राहुल देशमुख, प्रभाग समन्वयक मिलिंद ससाने ,आय.सी.आर.पी. शांत खंदारे ,प्रीती आरगुलवार ,ज्योती कांबळे , तसेच इत्यादी कॅडर उपस्थित होते .त्यांनी मिना सावंत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.