Home मनोरंजन निरंकारी मंडळाच्या शिबिरात 130 दात्यांचे रक्तदान !

निरंकारी मंडळाच्या शिबिरात 130 दात्यांचे रक्तदान !

154

 

बारामती – अशोक कांबळे
फलटण (प्रतिनिधी) – ‘आपले जीवन परोपकारासाठी वेचल्यानेच त्याचे मोल वाढते’ या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन 130 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. प्रामुख्याने यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे सांगितले.
संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सातारा झोन मधील फलटण शाखेच्या सत्संग भवनात, रविवारी (ता. 23) रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने, ज्ञानप्राचारक नवनाथ शेलार, फलटण शाखेचे मुखी अशोक लामकाने यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच येथील आजुबाजुच्या शाखांचे मुखी तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते.
बाबा गुरुबचनसिंहजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित शिबिरात 130 जणांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचे अनुपम दर्शन घडवले. निरंकारी जगतात 24 एप्रिल हा दिवस देश-विदेशात रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ‘मानव एकता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
बाबा हरदेव सिंह जी यांच्या ‘रक्त धामन्यांमध्ये व्हावे, नाल्यामध्ये नको’ या प्रेरित संदेशातून समस्त निरंकारी भक्तांना एक नवी सकारात्मक दिशा मिळाली. तोच प्रेरक संदेश जीवनात उतरवत निरंकारी भक्त लोक कल्याणाअर्थ आपल्या सेवा प्रदान करत आले आहेत. हे रक्त महाभियान भारतातील संत निरंकारी मिशन च्या सर्व 99 झोन मधील बहुसंख्य शाखांमध्ये राबवले गेले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी मिशनच्या सदस्यांनी विशेष परिसर घेतले
या शिबिरामध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चांदूलाल सराफ बारामती या रक्तपेढीने रक्त संकलन केले. फलटण शाखेचे प्रमुख अशोक लामकाने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here