✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 23 एप्रिल)
उमरखेड शहर व परिसरात रमजान ईद उत्साही वातावरणात संपन्न झाली इदगाह मैदानावर मौलवी यांनी ईद उल फित्रची नमाज पठण करून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली समस्त मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या.
ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासन व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने गुलाबाचे फुल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी ठाणेदार, ठाणेदार अमोल माळवे,वाहतूक शाखेचे सतीश खेडेकर, काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे,माजी आमदार विजयराव खडसे, भाजपा नेते किसनराव वानखेडे ,वंचित बहुजन पक्षाचे डि.के दामोदर ,विवेक मुडे, बाळासाहेब नाईक , वीरेंद्र खंदारे ,कैलास कदमसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व शहरातील मान्यवर मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
येथील मुस्लिम समाजाच्या वतीने काल शुक्रवार चंद्र दर्शनासाठी साक्ष मिळाल्याने आज शनिवार रोजी ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार आज ईद करण्यासाठी मुस्लिम धर्मियांनी तयारी केली नाग चौक येथील ईदगाह मैदान येथे आज सकाळी 9 वाजता नमाज पार पडली मुस्लिम बांधव नमाज पठनासाठी शहरातील अबालवृद्धसह लहान मोठ्या तरुण मुस्लिम बांधवांनी मैदान गर्दीने फुलून गेला होता .अल्लाह विषयी कृतज्ञता व्यक्त करत हिंदू समाज बांधवांनी एकमेकांना गळाभेट करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोबत इनायतउल्हा जनाब,एजाज जनाब, तालीब नेता, युसुफ सौदागर, झाकीर राज,मझर टेलर ,नाहीद नवाब , मुजीब खतीब, वासिफ पठाणसह शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.