Home नागपूर माझा सन्मान हा होमिओपॅथी शास्त्राचा आहे-डॉ. विलास गजपुरे होमिओपॅथीक मेडीकल असोशीएशन ऑफ...

माझा सन्मान हा होमिओपॅथी शास्त्राचा आहे-डॉ. विलास गजपुरे होमिओपॅथीक मेडीकल असोशीएशन ऑफ इंडियातर्फे सत्कार

92

नागपूर -काही वर्षापूर्वी होमिओपॅथी चिकीत्सकाची. स्थिती चांगली नव्हती. त्यावेळी त्यांचा उपहास केला जायचा, अशा निराशाजनक स्थितीनही होमियोपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन यांनी जगाला दिलेल्या होमिओपॅथी शास्त्राला सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम निष्ठापूर्वक सातत्याने करण्याचे कार्य होमिओपॅथी चिकीत्सकानी केले आहे. माझा सन्मान हा होमिओपॅथी शास्त्राचा आहे असे उद्‌गार ब्रम्हपुरी येथील ज्येष्ठ होमिओपॅथी चिकीत्सक डॉ. विलास गजपुरे यांनी काढले आहेत.
होमिओपॅथीक मेडीकल असोशिएशन ऑफ इंडिया नागपुर शाखेच्या वतीने होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या जंयती निमीत्य नागपुर विभागातील ज्येष्ठ चिकीत्साकाचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. नागपुरचें सुप्रसिद्ध होमिओपॅथी डाँ. विलास डांगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन झालेल्या या सोहळ्यात नागपुर विद्यापिठाचे प्र. कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते डॉ. विलास गजपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. विलास गजपुरे हे गेल्या ४० वर्षापासून ब्रम्हपुरी व नागभीड परीसरात होमिओपॅथीची सेवा देव आहेत. त्यांनी सुरु केलेली ही वैद्यकिय सेवा आता सर्वदूर गेली असून परीसरात आता भरपुर होमिओपॅथीक चिकीत्सक अतिशय कमी खर्चात सेवा देत आहेत. यासोबतच डॉ. विलास गजपुरे सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर असून, ब्रम्हपुरी अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्याकरीता ग्लोविट गोळ्याचे मोफत वितरण गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. दरवर्षी ग्रामीण भागात होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार करण्याकरीता मोफत आरोग्य शिबीर घेत असतात. त्यानी ब्रम्हपुरी येथे नॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथी ब्रम्हपुरी ची स्थापना केली असुन दरवर्षी विवीध कार्यक्रमांचे आयोजन या माध्यमातून केले जातात.
होमिओपॅथी चिकित्सेच्या माध्यमातून ब्रम्हपुरी व नागभिड परीसरात होमिओपॅथीचा केलेला प्रचार व प्रसार निष्ठापूर्वक करीत रुग्णसेवा केल्यामुळे डॉ. विलास गजपुरे यांचा असोशिएशनतर्फे सन्मान केल्याबद्दल परीसरातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here