Home पुणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकारांस आर्थिक मदत पिंपरी...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकारांस आर्थिक मदत पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ईदनिमित्त केले होते आयोजन

63

 

पुणे : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने ईद निमित्त पत्रकारांस एक हात मदतीचा हा उपक्रम राबवून ईद साजरी करण्यात आली.
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या युक्तीप्रमाणे पत्रकारांच्या अडचणीच्या वेळी त्यांना जमेल तशी मदत करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी आपली सामाजिक बांधिलकी नेहमी जपत आहे.
पत्रकार अली इराणी यांना गेल्या काही दिवसापासून घरातील आजारपणा मुळे मानसिक त्रास सहन करावा लागत होता. शिवाय पती-पत्नी दोन मुले आई असे कुटुंब सांभाळत मुलांचे शिक्षण व कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यातून प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचे काम अली इराणी करीत आहेत. त्यांनी अनेक वेळा पत्रकारितेतील हल्ल्याविरुद्धही लढा दिला आहे.
पत्रकार अली इराणी यांनी प्रतिकूल परिस्थितीतही काही पत्रकारांना ईद निमित्त घरी निमंत्रण दिले. त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीचा लढा पाहता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने ईद निमित्त इराणी कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देऊन ईदनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद शिरकुर्माचां गोडवा याच्या समिश्रणाने ईद गोड झाली यात शंका नाही.
यावेळी इराणी कुटुंबीयांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडचे मनःपूर्वक आभार मानले व संघाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सौ मंदा बनसोडे, शहर अध्यक्ष राजेश शिंदे, उपाध्यक्षा उषा लोखंडे,सचिव निर्मला जोगदंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here