बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी
पुसद -तालुक्यातील मांडवा येथे क्रांतीसुर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मांडवा येथील शांतीधाममधील लोकसभासहभागातून लावण्यात आलेल्या वृक्षांचे अडीच वर्षापासून विनामूल्य संगोपन व संवर्धन करणारे वृक्षप्रेमी कैलास राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन पुसद येथील श्री सत्यसाई सेवा समिती यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच तहानलेल्या पशुपक्ष्यांसाठी शांतीधामातील पिंपळ, लिंब या झांडावर, निवाराशेड, गावातील पिंपळ, लिंब या झाडांवर आळण्या बांधून तृष्णातृप्तीची व्यवस्था केली.
तसेच जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून शांती धाममध्ये वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी शांतीधाममधील वृक्षसंवर्धनासाठी संतोष तडकसे अध्यक्ष वीरशैव लिंगायत समाज पुसद व महादेव डोळस यांनी ३० साड्या भेट दिल्या.
यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते,महादेव डोळस, श्री सत्यसाई सेवा समिती पुसद अध्यक्ष डॉ. संदीप चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे,तुकाराम चव्हाण, अजय विश्वकर्मा, ममता चव्हाण, ओममाला सोळंके, रमेश ढोले,कैलास राठोड, रमेश घुक्से,गजानन डोळस, संतोष आडे, विष्णू धाड, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदुम्न आबाळे, शेषराव जाधव, तसेच इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.