रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रह्मपुरी (दि.22 एप्रिल):- विदर्भामध्ये सर्वाधिक जास्त तापमान असलेला शहर म्हणजे ब्रह्मपुरी आहे. तापमान 43.08 असताना सुद्धा लखलखत्या उन्हामध्ये ब्रह्मपुरी- आरमोरी रोडवर असलेली रेल्वे फाटक पडल्यामुळे लहान -लहान मुले घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तापमानाचे चटके सोसावे लागत आहे. एकीकडे लग्नाची धामधुम आणि त्यामध्ये रेल्वे फाटकाचा मोठ्या प्रमाणात होणारा त्रास येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळी रेल्वे फाटक पडल्यामुळे अंदाजे 1-2 तास चक्क भर उन्हात उभे राहावे लागेल त्यामध्ये शालेय विद्यार्थी व लग्नाला जाणारे प्रवासी सुद्धा त्यामध्ये अडकले होते तेवढेच नव्हे तर जड वाहनाची रांग ही गंगाबाई तलमले कॉलेज पासून तर सावजी धाब्यापर्यत होती. असे परिस्थितीमध्ये सुद्धा ब्रह्मपुरी पोलीस विभागाचे ट्राफिक पोलीस राहुल लाखे व त्यांचे सहकारी यांनी रेल्वे फाटक उघडल्यानंतर जाणार- येणाऱ्या प्रवाशांचे मार्ग मोकळे मोकळे करून दिले. चिमूर -गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडट्टीवार व स्थानिक नेते यांनी ब्रह्मपुरी -आरमोरी रोडवर असलेल्या रेल्वे फाटकाचे बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी समस्त ब्रह्मपुरीवासी यांनी केली आहे. या संदर्भामध्ये ब्रह्मपुरी येथील काही विविध पक्षाच्या नेत्यांनी व विविध संघटनेने उपविभागीय अधिकारी यांना उड्डाण पुलाची बांधकाम त्वरित करण्याची मागणी सुद्धा निवेदनात केली होती. परंतु निवेदनाची केराची टोपली झाले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी आरमोरी रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधकामाकरिता मंजुरी मिळाली असता , शासनाने त्या जागेवर पाणी व गिट्टी तपासणी केली होती. परंतु आता सरकार बदलल्यामुळे त्या कामावरच स्थगिती असल्यामुळे थोडा विलंब लागत असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून मिळाली आहे.
Home चंद्रपूर ब्रम्हपुरी-आरमोरी रोड वरील रेल्वे फाटक उड्डाण पुलाचे बांधकाम त्वरित करा: ब्रह्मपुरी वासियांची...