बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी
दिग्रस – दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने दिग्रस तालुका शाखेच्या वतीने दि.२२ एप्रिल२०२३ पासुन ते दि.१ मे२०२३ पर्यंत दिग्रस तालुका पातळीवरील एकुन २० ठिकाणी दहा दिवशीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम दि.२ मे२०२३ला दिग्रस येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनायक देवतळे तालुकाध्यक्ष दिग्रस हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून रवी भगत जिल्हाध्यक्ष यवतमाळ हे उपस्थित राहणार आहेत. तसेच पाहुणे म्हणून रुपेश वानखडे जिल्हा सरचिटणीस यवतमाळ, अनुसया वाठोरे शहराध्यक्षा दिग्रस, मोहन भावरे यवतमाळ तालुकाध्यक्ष, सिद्धार्थ गायकवाड दारव्हा तालुकाध्यक्ष ,नागोराव बनसोड आर्णी तालुकाध्यक्ष, भारत कांबळे माजी सैनिक , तालुकाध्यक्ष पुसद,भोलानाथ कांबळे, ल.पू. कांबळे शहराध्यक्ष पुसद तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी १९ केंद्रिय शिक्षिका आणि १ केंद्रीय शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या दहा दिवशीय उपासिका धम्म प्रशिक्षण २० ठिकाणावरील शिबिरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी खालील प्रमाणे केंद्रीय शिक्षिका व केंद्रीय शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
(१)भिमनगर दिग्रस,रंजना ताकसांडे यवतमाळ
(२)आरंभी, नंदा भगत वाशिम
(३)डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सास्कृतिक भवन दिग्रस,जोती कुंथे नादेड
(४)गंगानगर विजया सिसले
(५)महागाव संगीता कुंभारे यवतमाळ
(६)कलगांव (जूना) अलका वाकोडे आर्णि
(७)विठोली प्रतिभा पाटील यवतमाळ
(८)लाख उषा सिरसाठ धुळे
(९)इसापुर सुनंदा पिसोळकर धुळे
(१०)सिंगद उमा इंगोले वर्धा
(११)सिध्दार्थ नगर दिग्रस मिना मस्के वर्धा.
(१२)तुपटाकळी सुनंदा तेलगोटे अकोला
(१३)रोहनादेवी , वर्षा हिवराळे अकोला
(१४)वाई मेंडी अलका दुपारे चंद्रपुर
(१५)चिरकुठा वैशाली पाटील वणी (१६) काळी माया लढे यवतमाळ
(१७)निंभा , आशा तीरपुडे यवतमाळ
(१८)हरसुल येथे दि. २६ एप्रिल २०२३पासुन बालसंस्कार शिबिरासाठी जयकुमार भवरे केंद्रीय शिक्षक कळंब
(१९)कलगाव नवीन ,अनिताताई खंडारे नांदेड
(२०)चिंचोली, प्रतिभा रामटेके यवतमाळ
या दहा दिवशीय धम्म उपासिका शिबिरासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस येथील सर्व पदाधिकारी, सदस्य मंडळी अथक परिश्रम घेत आहेत.