Home यवतमाळ तालुकास्तरीय वन हक्क कायद्या बाबत क्षमता बांधणी प्रशिक्षण

तालुकास्तरीय वन हक्क कायद्या बाबत क्षमता बांधणी प्रशिक्षण

111

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.18 एप्रिल)
पंचायत समिती उमरखेड येथे तालुकास्तरिय वनहक्क कायद्या बाबत क्षमता बांधणी प्रशिक्षण घेण्यात आले.

फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी, यवतमाळ व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 750 वन हक्क प्राप्त गावांमध्ये अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी ( वन हक्क मान्य ) अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्या अंतर्गत या वन हक्क प्राप्त ग्रामसभाना सामुहिक वनाचा अधिकार प्राप्त झाला असुन या ग्रामसभाना वन हक्क कायदाची समज वाढवण्यासाठी प्रशासन स्तरावर सर्व शासकीय विभागाच ग्रामसभाना सहकार्य मिळण्यासाठी संबंधित शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांची वन हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करिता काय भूमिका जबाबदारी व कर्तव्य आहेत. या बाबत पंचायत समिती उमरखेड येथे प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणाचे अध्यक्ष एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सहा. प्रकल्प अधिकारी अहिरे प्रमुख पाहुणे व्यंकट राठोड (उप विभागीय अधिकारी), देऊळगावकर (तहसिलदार), पाईकराव (नायब तहसीलदार) प्रविणकुमार वानखडे (गट विकास अधिकारी), पांडे, खेलबडे, वन परिक्षेत्र अधिकारी, पराते उपविभागीय विभागाचे वरिष्ठ लिपिक, माने अमोल चव्हाण, मुंडे , विस्तार अधिकारी पंचायतसमिती उमरखेड, वन व्यवस्थापक संजय तीळेवाड, यांच्या उपस्थिती मध्ये घेण्यात आले असुन प्रशिक्षणासाठी ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, इत्यादी मोठया संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षणा मध्ये वन हक्क कायदा 2006 याची स्पष्टता, सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे कायद्याच्या नियमांनुसार पुनर्रगठन ग्रामसभेतुन करून घेणे, सोबतच समितीला बँक खाते उघडण्यासाठी सहकार्य करणे, जोडपत्र तीन व चार याची सत्य प्रत ग्रामसभा कार्यालयात फ्रेम करून लावणे, ग्रामसभेला मिळालेल्या सामुहिक वन हक्क क्षेत्राचे सिमांकन वन विभागा मार्फत करून दर्शनी स्थळी सामुहिक वन जंगलाच्या माहितीचे फलक लावणे, संवर्धन व व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करणे, सोबतच ग्रामसभेला मिळालेल्या सामुहिक वन हक्क प्राप्त क्षेत्राचे संरक्षण, पुनर्रनिर्माण, संवर्धन, परिरक्षण व व्यवस्थापन नियोजन पुर्वक कसे करावेत याविषयी सविस्तर अशी माहिती या सामुहिक वन हक्क क्षमता बांधणी प्रशिक्षणाच्या माध्यमातुन करून देण्यात आली.

इत्यादी विषयी प्रशिक्षणा मध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सोबतच जंगल आधारित गौण वन उपज व औषधी वनस्पती पासुन रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी ग्रामसभाना मार्गदर्शन करणे लोकांना जंगला बाबत जिव्हाळा व आपलं जंगल ही भावना निर्माण करणे. जल, जंगल, जमीन, जनावर या चार ‘ज’ चा जनतेने विकास कसा करावा यासाठी प्रोत्साहित करणे या प्रमाणे प्रशिक्षणाच्या मध्यमातुन मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणा मध्ये अध्यक्ष अहिरे साहेब यांनी वन हक्क कायदाची प्रभावी अंमलबजावणी करिता प्रशासन पुर्ण सहकार्य करतील असे त्यांनी मांडले.

हे प्रशिक्षण श्रीहरी पेंदोर एफ इ एस संस्था, मन्सूर खोरासी दिलासा संस्था यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आले असुन या प्रशिक्षणात मार्गदर्शन रजनी चौधरी, शितल ठाकरे, संजय तीळेवाड वन व्यवस्थापक व संतोष सरदार यांनी केले आहेत तर प्रशिक्षण यशस्वी पूर्ण होण्यासाठी शेवंतराव गायकवाड फिल्ड ट्रेनर यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here