अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आ. डॉ.मधुसूदन केंद्रे व राष्ट्रवादीचे युवा नेते ॲड.मिथिलेश केंद्रे यांचेकडून दि.२० एप्रिल 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर ‘दावत-ए- इस्तार’चे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या गुरुवारी (दि.२०) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे व युवा नेते ॲड.मिथिलेश केंद्रे यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास परभणीचे खासदार संजय जाधव, राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्यसभा सदस्या डॉ.फौजीया खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्वाणी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर, माजी आ.विजय भांबळे, माजी आ.सिताराम घनदाट, माजी आ.विजय गव्हाणे, परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट, विधानसभा अध्यक्ष श्रीकांत भोसले, तालुकाध्यक्ष माधव भोसले, शहराध्यक्ष जमीर भाई, माजी शहराध्यक्ष अकबर सय्यद यांचे उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.