🔸अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी गजानन चौधरी यांची निवड !
🔹मोर्शी तालुक्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण !
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
अमरावती(दि.19एप्रिल):-जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली असून दापोरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी यांची अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दापोरी येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख गजानन चौधरी यांची अखिल भारतीय शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा दापोरी येथे भावपूर्ण सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ अमरावती च्या अध्यक्ष पदी निवड लोकशाही मार्गाने जिल्हा अधिवेशनात करण्यात आली असून गजानन चौधरी हे शिक्षण, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असून त्यांना त्यांच्या कामाची पावती अध्यक्ष पदाच्या रूपाने मिळाली असे दापोरी येथील सरपंच संगीता ठाकरे यावेळी म्हणाल्या या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी यांचा सत्कार ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, सरपंच संगीता ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अंकिता विघे, प्रीती चौधरी, महादेव मसाने, नरेंद्र चौधरी, शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही विशाल संघटना असून ती जागतीक महासंघाशी जोडलेली एकमेव संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून शिक्षिकांना अनेक लाभ मिळवून दिलेले आहेत. शिक्षक नोकरी करीत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.शिक्षकांच्या हक्कासाठी राष्ट्र, राज्य व तळगाळात झटणारी संघटना असा संघटनेचा नावलौकिक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय प्राथमिक संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी यावेळी केले.
‘‘शिक्षकांच्या विविध प्रश्नांसह जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रम, योजना राबविण्यावर भर दिला जाईल.’’ — गजानान चौधरी जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ अमरावती जिल्हा.