Home Breaking News वडूज नगरीत डॉ आंबेडकर जयंती निम्मित इफ्तार पार्टीत जय भिम,, जय मिम...

वडूज नगरीत डॉ आंबेडकर जयंती निम्मित इफ्तार पार्टीत जय भिम,, जय मिम चा बुलंद नारा…

100

सातारा/खटाव/ नितीन राजे
वंचित बहुजन आघाडी वडूज शहर तर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी चे नियोजन केले. यावेळी जय भिम,, जय मिम चा नारा देण्यात आला.दलित- मुस्लिम समाजाची नाळ कधी तुटू शकत नाही असे मुस्लिम युवा नेते इम्रान बागवान व वंचित बहुजन आघाडी युवा नेते तुषार बैले यांनी केले. तसेच एकमेकांना मिठाई चारून भाई चारा दाखवून दिला.
सध्या देशात जातीयवादी पक्ष महागाई, बेरोजगारी बद्दल ‘ब्र ‘शब्द काढत नाही. याउलट सत्ताधारी पक्ष धर्म पुढे आणत आहेत. आज हिंदू बांधव सुद्धा महागाई ने त्रस्त आहेत.
ह्या देशाला डॅा.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालवायचं प्रामाणिक काम हे पूर्वीपासून राष्ट्रीय कॅाग्रेस पक्षानेच केले आहे.
आज देशात संविधानाचा विचार होत नाही. ह्या देशातून संविधान संपवण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे चालू आहे. त्याला छेद देण्याचे काम मुस्लिम व दलित बांधव करू शकतात.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त रमजान रोजा इफ्तार पार्टीचे वंचित बहुजन समाजातील बांधवांनी केले आहे. ही चांगली बाब आहे. असे प्रेम कायमस्वरूपी राहू दया. ही भावना या वेळीइम्रान बागवान यांनी व्यक्त केली.
यावेळी वडूजचे माजी नगराध्क्ष डॉ महेश गुरव, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ, जेष्ठ नेते अशोक बैले, नगरसेवक तुषार बैले, अजित नलवडे, जविद मनोरे, शकील मुल्ला, आयाज मुल्ला, शरीफ अत्तार, डॉ अकबर काजी, शेखर जाधव, धनंजय चिंचकर, सज्जाद शेख, जावेद मुल्ला, इकबाल शेख, अजित रायबोले, प्रविण रायबोले, इम्रान खान, आरिफ मुल्ला, अमीन मुल्ला, दाऊद खान मुल्ला, सिकंदर मुल्ला, इसाक मुल्ला, मुन्ना मुल्ला, कुणाल रायबोले, बरकत मुल्ला, धनाजी कांबळे, गणेश रायबोले, ताहीर मोमीन, मंगेश राय बोले, सिद्धार्थ लोंढे, शफीक मुल्ला, नितीन नलावडे, अधिक वाघमारे, बाकुभाई मुल्ला आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here