✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.18 एप्रिल)
शहरातील सम्यक बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश दुधेवार सर माजी नगरसेवक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकरराव लोमटे सर सामाजिक कार्यकर्ते हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
आणि स्पर्धेमधील भाग घेतलेल्या स्पर्धकांना दुधेवार सर व लोमटे सर यांच्या हस्ते “एक वही एक पेन” या प्रकारचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
एकूण 18 स्पर्धकांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता.
यातील डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्र. कु. ऋतुजा मुकेश दिवेकर, कु. अंजली विक्की वाडेकर (ग्रुप डान्स), द्वितीय क्र. कु.प्राची श्रवले, कुमारी वैष्णवी तिव्हाळे (ग्रुप डान्स), तृतीय क्र. कु.अंजली सुरेश गायकवाड चौथा क्र. कु. निकिता गौतम दिवेकर, पाचवा क्र. शैलेश राजकुमार दिवेकर तर सहावा क्र. कु. आरुषी किरण दिवेकर हिने प्राप्त केला.
व तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल प्रोत्साहनपर संघवी दिवेकर, संघकारा दिवेकर,नमिता इंगोले,श्रद्धा दिवेकर,स्वराज पाईकराव बक्षीस देण्यात आले.
तसेच संगीत खुर्ची या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लहान मुलांमुलीमध्ये चिंटू गौतम गायकवाड, दुर्गा सुरेश दिवेकर, तर संघवी सिद्धार्थ दिवेकर, विराट दिलीप धुळेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रफुल दिवेकर आणि पत्रकार तथा कोषाध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांनी केले होते.
यावेळी हिराबाई दिवेकर, शंकरराव दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव,भारताबाई दिवेकर, यशोदाबाई दिवेकर, उषाताई इंगोले, मीराबाई दिवेकर, मारुती दिवेकर इत्यादी अनेक बालक बालिका व उपासक, उपासिका उपस्थित होते.
यावेळी आकाश श्रवले,अंकुश दिवेकर,अमोल दिवेकर,योगेश दिवेकर यांनी परिश्रम घेतले.